Friday, May 31, 2024
Homeमहाराष्ट्रबारामतीत प्रशिक्षण देणारं विमान पुन्हा कोसळलं, चार दिवसातली दुसरी घटना

बारामतीत प्रशिक्षण देणारं विमान पुन्हा कोसळलं, चार दिवसातली दुसरी घटना

पुणे | Pune

दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील बारामतीत विमान कोसळल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी सात वाजेच्या सुमारास पुन्हा शिकाऊ विमान कोसळले आहे. बारामती येथील जुन्या सह्याद्री काऊ फार्मजवळ हे विमान कोसळले आहे.

- Advertisement -

यामध्ये वैमानिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. बारामतीत विमान प्रशिक्षण संस्था आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळू शकलेली नाही. आजच्या अपघातातही विमानाच्या पुढील बाजूचे नुकसान झाले असून विमान उलटे पडल्याचे दिसत आहे.,

गेल्या काही दिवसातील विमान कोसळल्याची ही पाचवी घटना आहे. आता कोसळलेले विमान नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अचानक विमान कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून शिकाऊ विमान कोसळल्याच्या घटना घडत आहेत. बारामती आणि इंदापूर येथे विमान कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विमान कोसळल्याने माणसाचा जीव जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या