Wednesday, February 4, 2026
Homeनगरलोहगाव येथे कृषी महाविद्यालय सोनईच्या विद्यार्थ्यांकडून 'प्लांट क्लिनिक' कार्यक्रमाचे आयोजन

लोहगाव येथे कृषी महाविद्यालय सोनईच्या विद्यार्थ्यांकडून ‘प्लांट क्लिनिक’ कार्यक्रमाचे आयोजन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कृषी महाविद्यालय, सोनई येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी RAWE & AIA कार्यक्रमांतर्गत  लोहोगाव गावात “प्लांट क्लिनिक” कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात कृषिकन्या पुनम भवर, नम्रता चोपडे, वैष्णवी फरताडे, स्नेहल खेडकर, वैष्णवी कदम  यांनी शाश्वत शेती पद्धती, जैवखते वापराचे महत्त्व आणि त्याचा शेतीतील उपयोग याबद्दल सविस्तर माहिती दिली.

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी विविध कीड, रोग, अन्नद्रव्य कमतरता यांचे जिवंत नमुने दाखवले तसेच शेतातून उपयुक्त व हानिकारक तणांचेही नमुने गोळा करून शेतकऱ्यांना त्यांची ओळख करून दिली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये शेतीविषयक साक्षरता वाढण्यास मदत झाली.

YouTube video player

कार्यक्रमास गावातील सर्व शेतकरी, शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच व उपसरपंच यांचीही विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले, कार्यक्रम अधिकारी डॉ. निर्मला विधाते आणि प्लांट क्लीनिक समन्वयक प्रा. श्रीकृष्ण हुरुळे यांनी केले.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...