धुळे – Dhule
- Advertisement -
साक्री (Sakri) तालुक्यातील दहिवेल (Dahivel) येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींची शाळेमध्ये (Zilla Parishad Marathi School) आज पंचायत समिती अंतर्गत मुलींना पोषण आहार वाटप करण्यात आला. त्या पोषण आहारमध्ये चक्क प्लास्टिकचे तांदुळ (Plastic rice) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
रविंद्र कुवर यांनी दहिवेल गटाचे जि.प सदस्य खंडू कुवर (Khandu Kumar) व पंचायत समिती सभापती यांचे प्रतिनिधी पंकज सुर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तत्काळ दहिवेल मराठी शाळा येथे धाव घेत तांदुळची पाहणी केली.
त्यानी तांदुळाच्या तपासणीसह संबधित अधिकारी, ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. यावेळी दहिवेल प.स सदस्य हिराबाई सोनवणे, रमेश सुर्यवंशी, गणेश गावित, एकनाथ सोनवणे, रविंद्र कुवर, रमेश बागुल, राजू भिल आदी उपस्थित होते.