Saturday, May 4, 2024
Homeजळगावएसटी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का

एसटी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का

जळगाव – प्रतिनिधी Jalgaon

गेल्या चार-पाच महिन्यांपासून कोरोना साथरोग प्रादूर्भाव प्रतिबंधक योजनांची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाउन टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आल्याने या कालावधीत सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे, एस.टी.परीवहन सेवा देखिल स्थगीत करण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

यामुळे कोणतीच वाहने रस्त्यावर आली नाहीत. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत देखिल नियमित परीवहन सेवेव्दारे महसूल जमा झालेला नाही. अद्यापही तुरळक मार्गावर परीवहन सेवा सुरू करण्यात आली असली तरी अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यापासून एस.टी.परीवहन महामंडळाच्या अधिकारी कर्मचार्‍यांचे वेतन थकीत झाले होते.

गत दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाकडून चालक वाहकांसह अन्य कर्मचारी अधिकार्‍याचे वेतन संबधितांच्या बॅक खात्यांवर जमा करण्यात आले आहेत. यात मार्च २५ टक्के, मे ५० टक्के आणि जूनचे पूर्ण वेतन ज्यांचे स्टेट बॅकेत खाते आहे त्यांचे जमा झाले असून अन्य बँकेत खाते असलेल्या कर्मचार्‍यांचे वेतन सोमवारी जमा होणार असल्याचे जळगाव विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दै.देशदूतशी बोलतांना सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या