धुळे – प्रतिनिधी dhule
तालुक्यातील वकवाड शिवारातील वनजमिनीवरील (Forest land) गांजा शेतीवर तालुका पोलिसांनी (police) काल कारवाई केली. एकुण 1 लाखांची झाडे जप्त करण्यात आली असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लंम्पीतही भरला गुरांचा बाजार
वकवाड शिवारातील वनजमिनीवर प्रतिबंधीत असलेल्या मानवी मेंदुवर विपरित परिणाम करणार्या गांजा सदृश्य अंमली पदार्थाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवाड केली असल्याची गोपनिय माहिती शिरपूर (shirpur) तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि सुरेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने काल काल दुपारी वकवाड शिवारातील गांजा शेतीचा शोध घेतला.
तेव्हा शेतात चार ते सहा फुट उंचीची गांजाची झाडे दिसून आल्याने झाडे मुळासकट तोडण्यात आली. एकुण 1 लाख 9 हजार 260 रूपये किंमतीची झाडे जप्त करण्यात आली. तसेच संशयीत वनसिंग उर्फ वनाश्या सरदार पावरा (वय 35 रा. वकवाड) याला अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात एनडीपीएस अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि सुरेश शिरसाठ करीत आहेत.