Saturday, May 18, 2024
HomeनगरPM Awas Yojana : ‘मोदी आवास’साठी जिल्ह्यातून 20 हजार ओबीसी लाभार्थी पात्र

PM Awas Yojana : ‘मोदी आवास’साठी जिल्ह्यातून 20 हजार ओबीसी लाभार्थी पात्र

अहमदनगर (प्रतिनिधी)

केंद्र सरकारच्यावतीने राबवण्यात येणार्‍या पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांमधून आता ओबीसी प्रवर्गातील लाभार्थी यांची नावे स्वतंत्र करून त्यांची नव्याने यादी तयार करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेणे तयार केलेल्या यादीत जिल्ह्यात 20 हजार 300 ओबीसी लाभार्थी पात्र आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी अध्यादेश काढत राज्यातील ओबीसी प्रवर्गातून घरकुलांसाठी पात्र असणांसाठी ‘मोदी आवास’ योजनेची घोषण करत 3 लाख घरकुलांसाठी मान्यता दिली आहे. यात आता नगर जिल्ह्यातील पात्र असणार्‍या ओबीसी प्रवर्गातील किती ओबीसी लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने घरकुल पात्र लाभार्थी ‘ड’ वर्ग यादी तयार करण्यात आलेली आहे. या यादीला आवस प्लस असे संबोधण्यात आले असून या यादीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जामती प्रवर्गात मोडणार्‍या घरकुल पात्र लाभार्थ्यांना वगळून ओबीसी, अल्पसंख्या आणि खुल्या प्रवर्गातील लाभार्थी यांची नावे टाकण्यात आलेली आहेत. या आवास प्लस घरकुल पात्र योजनेच्या यादीत 1 लाख 7 लाभार्थी होते. यातून स्वतंत्रपणे आता 20 हजार 300 ओबीसी लाभार्थी नावे वेगळी करण्यात आलेली आहे. या लाभार्थ्यांना राज्य सरकारने शुक्रवारी मान्यता दिलेल्या मोदी आवास योजनेतून घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर घरकुलांच्या यादीत 92 अल्पसंख्याक प्रवर्गातील लाभार्थी तर ओबीसी वगळून खुल्या आणि अन्य प्रवर्गातील 87 हजार लाभार्थी यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आलेली आहे.

राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण मंडळाने राज्यात ओबीसी प्रवर्गातील पात्र घरकुल लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजनेची घोषणा करत वर्षभरात 3 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले आहे. या मंजूर उद्दिष्टातून नगर जिल्ह्यातील 20 हजार 300 पात्र लाभार्थींपैकी किती जणांना घरकुलांची लॉटरी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. मोदी आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षेतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या