Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPM Modi: "विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत…"; पंतप्रधान मोदींनी दिल्या आषाढी...

PM Modi: “विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत…”; पंतप्रधान मोदींनी दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

पंढरपूर | Pandharpur
चंद्रभागेच्या तिरी.. पहा मंदिरी तो पहा विटेवरी… विठ्ठल विठ्ठल जयहरी…दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी.. विठ्ठल विठ्ठल जयहरी… असेच काहीस चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे. पंढरपूरमध्ये आषाढीचा सोहळा आज (दि. 6) भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींसह संतांच्या पालख्या रात्री तीर्थक्षेत्र पंढरीत दाखल झाल्या आहेत. यंदा आषाढी सोहळ्यासाठी सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. यामुळे पंढरपूर नगरी भाविकांच्या भक्तीमय वातावरणात दंग झाली आहे. दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘एक्‍स’ वरील पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे की, आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहू या.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकिय महापुजा
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान पांडुरंगाची पूजा करायला मिळणे, हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो आणि याचे शब्दात वर्णन अशक्यप्राय आहे. आपल्या वारीची परंपरा कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता अखंडितपणे सुरु आहे. मुघली आक्रमण व इंग्रजांच्या राजवटीतही ही परंपरा अव्याहतपणे सुरु राहिली. सातत्याने या परंपरेत वाढ होत जात आहे. दिंड्यांसोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. त्यात युवकांची वाढलेली संख्या खूप समाधान देणारी आहे, राज्य शासनाने यावर्षी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न झाली, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

YouTube video player

पंढरपूरात लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. 5,200 जादा बसेस आषाढीकरिता सोडल्या आहेत. जादा रेल्वे गाड्यादेखील धावत आहेत,खासगी वाहनांनीदेखील भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. दर्शन रांग मंदिरापासून पत्राशेडच्या पुढे गोपाळपूर येथून पुढे रांझणी रस्त्यावर 7 कि.मी.पर्यंत गेली आहे. दर्शन रांगेत 4 लाखांहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत, तर 65 एकर भक्तिसागरात 4 लाखांहून अधिक भाविक वास्तव्य करत आहेत. येथील तूंब, राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले आहेत.

भाविकांना दर्शनासाठी १० ते १२ तासांचा वेळ
यंदा भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे दर्शन रांग ७ कि.मी. पर्यंत पोहोचली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी किमान १० ते १२ तासांचा कालावधी लागत आहे. आणखी दर्शन रांग पुढे पुढे सरकत चालली आहे; तर मुखदर्शन रांगही मंदिरापासून विठ्ठल अन्नक्षेत्रापासून पुढे संभाजी महाराज पुतळा ते काळा मारुतीपर्यंत जाते. येथूनही पुढे चौफळ्यापर्यंत मुखदर्शन रांग येत आहे. तर मुख दर्शनासाठीदेखील किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...