Monday, May 27, 2024
Homeदेश विदेशअटल बोगदा लष्करासाठी ठरणार वरदान

अटल बोगदा लष्करासाठी ठरणार वरदान

नवी दिल्ली –

जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या ‘अटल टनेल’ या महामार्ग बोगद्याचे शनिवारी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या

- Advertisement -

हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर देखील यावेळी उपस्थित होते. माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांचे नाव या बोगद्याला दिले गेले आहे. भारतीय लष्करासाठी हा बोगदा वरदान ठरणार आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील रोहंताग पासजवळ एक ऐतिहासिक बोगदा बनवण्याची घोषणा स्वत: वाजपेयी यांनी 3 जून 2000 साली केली होती. तो आता वाहतुकीसाठी तयार झाला. महत्त्वाचे म्हणजे भारत-चीनदरम्यान ताणलेले संबंध आणि युद्धजन्य स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला हा बोगदा वरदान ठरणार आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला 9.02 किमी लांबीचा अटल टनल रोहतांग हा बोगदा पीरपंजाल डोंगररांगांना भेदून 3,300 कोटी रुपये बनवण्यात आला आहे. हा बोगदा जगातील सर्वाधिक 10,040 फूट उंचीवर बनवण्यात आला आहे.

या बोगद्यामुळे चीनला लागून असलेल्या लडाख आणि पाकिस्तानला लागून असलेल्या कारगिलपर्यंत भारतीय सैन्याला सहज पोहोचता येणार आहे. या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचं अंतर 46 किमीने कमी होणार आहे. त्यामुळे केवळ दीड तासात मनाली ते केलांगपर्यंत पोहोचता येणार आहे.

या बोगद्यात प्रत्येक 150 मीटर अंतरावर टेलिफोनची सुविधा असेल. 60 मीटरवर हायड्रेंट, 500 मीटरवर आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग, प्रत्येक 1 किमीवर हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. प्रत्येक त्याचबरोबर 250 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.

दरम्यान, 1972 मध्ये माजी आमदार लता ठाकूर यांनी सहा महिने बर्फात अडकून पडण्याच्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी बोगदा निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर सन 2000 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले मित्र टशी दावा ऊर्फ अर्जुन गोपाल यांच्या निमंत्रणावरुन केलांग येथे जाऊन रोहतांग बोगद्याच्या उभारणीची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर 28 जून 2010 मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी बोगद्यासाठी 1,355 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.

रसद पुरवणे सोपे

अटल बोेगद्यामुळे हिमाचल प्रदेशातील जनतेला तर मोठा फायदा होईलच, परंतु भारतीय लष्कराला रसद पुरवणे हे काम देखील सोपे होणार आहे. तसेच चीनकडील सीमेवर कोणत्याही ऋतुमध्ये पोहोचणे देखील आता सोपे होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या