Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्या“पंतप्रधानांना गांभीर्य नाही, मणिपूरबाबत बोलताना ते...”; राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

“पंतप्रधानांना गांभीर्य नाही, मणिपूरबाबत बोलताना ते…”; राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिलं. पण मणिपूरच्या विषयावर त्यांनी समाधानकारक उत्तर दिली नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच आपल्या सव्वा दोन तासांच्या भाषणात त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना टार्गेट केलं होतं. यावरुन आता काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधानांवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. तसेच पंतप्रधानांना मणिपूरच्या विषयाचं गांभीर्य नव्हतं असा आरोपही त्यांनी केला.

- Advertisement -

पंतप्रधानांनी संसदेत २ तास १३ मिनिटे भाषण केले. त्यात शेवटी फक्त दोन मिनिट ते मणिपूरवर बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे. लोक मारले जात आहेत, बलात्कार होत आहेत लहान मुलांना मारले जात आहे. दुसरीकडे पंतप्रधान संसदेत हसून हसून बोलत होते. जोक करत होते, हसून बोलत होते. हे पंतप्रदानांना शोभत नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. जर देशात हिंसाचार होत असेल तर भारताचे पंतप्रधान २ तासं त्याची खिल्ली उडवू शकत नाहीत. विषय काँग्रेस किंवा मी नव्हतो तर विषय मणिपूर होता. मणिपूरमध्ये काय होत आहे, आणि त्याला लगेच का थांबवले जात नाही, हा विषय आहे, असे राहुल म्हणाले.

तसेच, मणिपूरचं विभाजन झालं आहे. नरेंद्र मोदींना मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. ते थांबवायचं नाहीय. मणिपूर जळतेय, ते नरेंद्र मोदी विसरलेत, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. तसेच भारतीय लष्कराला सांगितल्यास मणिपूरमधील सुरु असलेला हिंसाचार ते २ दिवसात थांबवू शकतात. मणिपूर २ दिवसांत शांत होईल, पण नरेंद्र मोदींना मणिपूर जाळायचे आहे. त्यांना आग विझवायची नाहीय, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. मी मणिपूरमध्ये मैती भागात गेलो. त्यावेळी मला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की, माझ्या सुरक्षेमध्ये कोणी कुकी असेल, तर त्याला इथे आणू नका. आम्ही त्याची हत्या करु. आम्ही कुकींच्या भागात गेलो, त्यावेळी त्यांनी सुद्धा हेच सांगितलं. कुठला मैती इथे आणला तर आम्ही त्याला गोळी घालू. त्यामुळे मणिपूर एक राज्य नाहीय. त्याची दोन भागात विभागणी झालीय. राज्याची हत्या करण्यात आलीय. म्हणून मी म्हणालो, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करण्यात आलीय, असं राहुल गांधी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या