Sunday, September 8, 2024
Homeराजकीयसहा वर्षांपूर्वी 'गळाभेट' आता 'हस्तांदोलन'! PM मोदी आणि राहुल गांधींचा 'तो' चर्चेत

सहा वर्षांपूर्वी ‘गळाभेट’ आता ‘हस्तांदोलन’! PM मोदी आणि राहुल गांधींचा ‘तो’ चर्चेत

दिल्ली । Delhi

१८ व्या लोकसभा अध्यक्षपदासाठी (Loksabha Speaker Election) निवडणूक पार पडली असून भाजपच्या ओम बिर्ला (Om Birla) यांची पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्ष (Loksabha Speaker) म्हणून निवड करण्यात आली आहे. आवाजी मतदानाने झालेल्याला मतदानात एनडीए आघाडीच्या (NDA Alliance) ओम बिर्ला यांना बहुमत मिळाले असून लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा त्यांची वर्णी लागली आहे.

- Advertisement -

मात्र, या सर्व घडामोडींदरम्यान आज लोकसभेत एक दुर्मिळ प्रसंग घडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांवर परखड टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gndhi) यांनी एकमेकांना हसतमुखाने हस्तांदोलन केल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही नेत्यामध्ये झालेले हस्तांदोलन ऐतिहासिक ठरले. ओम बिर्ला यांचे अभिनंदन करीत दोन्ही नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान सहा वर्षांपूर्वी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीची जोरदार चर्चा झाली होती. २० जुलै २०१८ रोजी राहुल गांधी यांनी सभागृहात मोदींची गळाभेट घेतली होती. मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा सुरु असताना राहुल गांधीनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांचा उल्लेख करत मोदींसह भाजप सरकारवर चौफेर टीका केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या