नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान शुक्रवारी (15 नोव्हेंबर) तांत्रिक बिघाडामुळे देवघर एअरपोर्टवर थांबले आहे. यामुळे एअर ट्रॅफिकवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या प्रवासास विलंब होणार आहे. मोदी जमुईतील चाकईमध्ये सभा करून परतत होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान उड्डाण होऊ शकले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात प्रचाराच्या दौऱ्यावर होते. हा त्यांचा दौरा गुरूवारीच संपला होता. शिवाजी पार्कवर त्यांची शेवटची सभा पार पडली होती. या सभेनंतर ते दिल्लीत परतले होते. आज पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर होते. या दरम्यान पंतप्रधान मोदी एका विशेष विमानाने देवघर आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने जमुईला गेले होते. त्यानंतर परतीच्या प्रवासा दरम्यान पंतप्रधान मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे. खरे तर, झारखंडमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. या कार्यक्रमालाही पंतप्रधान मोदींची पोहोचले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
दरम्यान याआधी राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टतर गोंडामध्ये फसले होते. एटीएसने त्यांच्या विमानास उड्डाण करण्यास परवानगी दिली नव्हती. राहुल गांधी यांच्या चॉपरला हेलिपॅड सोबत उड्डाण करण्यास परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे अर्धा तासहून अधिक काळ राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर एकाच ठिकाणी उभे होते. याशिवाय, झारखंडमधील दुमका येथेही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे चॉपरही बऱ्याच वेळ अडकून पडले होते. या सर्व घटनांमगचे कारण म्हणजे, पंतप्रधानांचे विमान देवघर विमानतळावर उभे होते. यामुळे एअर ट्रॅफिक ब्लॉक करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींचे विमान अद्यापही देवघर एअरपोर्टवरच असल्याचे समजते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा