Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयNarendra Modi : वाशिमच्या सभेतून PM मोदींचा काँग्रेससह महाविकास आघाडीवर घणाघात; म्हणाले…

Narendra Modi : वाशिमच्या सभेतून PM मोदींचा काँग्रेससह महाविकास आघाडीवर घणाघात; म्हणाले…

वाशिम । Washim

वाशिमच्या पोहरादेवीमध्ये आज विकासकामांचं उद्घाटन झालं. बंजारा समाजाच्या इतिहासाचं, परंपरेचं प्रतिक असणाऱ्या ‘बंजारा विरासत’चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी उपस्थित बंजारा समाज बांधवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर घणाघाती टीका केली. मोदींनी काँग्रेसवर आतापर्यंतचा मोठा वार केला आहे. अर्बन नक्षलची गँग काँग्रेस चालवत असल्याची जहाल टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

- Advertisement -

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, आपल्या बंजारा समाजाने अनेक संत दिले. त्या संतांनी अध्यात्मिक यात्रेला चैतन्य दिलं. इंग्रजांनी या समुदायाला गुन्हेगार घोषित केलं होतं. पण स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाची काळजी करणं, त्यांना सन्मान देणं गरजेचं होतं. पण काँग्रेसने त्यांना आपल्या बरोबरीचं मानलं नाही. त्यांना वाटतं फक्त आमचीच सत्ता राहावी. त्यामुळे त्यांनी बंजारा समाजाला दूर ठेवलं. बंजारा समाजाला सन्मान देणं हे नंतरच्या सरकारची जबाबदारी होती, असे मोदी म्हणाले.

तसेच, काँग्रेसला दलितांना दलित ठेवायचं आहे. गरीबांना गरीब करायचं आहे. त्यामुळे काँग्रेसपासून सावध राहा. अर्बन नक्षल चळवळ काँग्रेसला चालवत आहे. काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहे. त्यामुळे ते आपल्यात फूट पाडू पाहत आहे. त्यामुळे एक व्हा. ही वेळ एकत्र राहण्याची आहे. दिल्लीत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. त्याचा मुख्य आरोपी काँग्रेसचा नेता निघाला. काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे. त्या पैशापासून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. आपल्याला सावध राहायचं आहे. इतरांना सावध करायचं आहे. सोबत मिळून लढायचं आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...