Sunday, September 8, 2024
Homeदेश विदेशभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जगात चलती; 'एक्स' वर झालेत 'इतके' मिलियन फॉलोअर्स

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जगात चलती; ‘एक्स’ वर झालेत ‘इतके’ मिलियन फॉलोअर्स

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवण्यात आला आहे. रविवारी (१४ जुलै) त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर १०० दशलक्ष म्हणजेच १० कोटींहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. या लोकप्रियतेपुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सुद्धा मागे पडलेत. बायडन यांचे ३८.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर दुबईचे राजे शेख मोहम्मद यांचे ११.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर पोप फ्रान्सिस यांचे १८.५ मिलियन फॉलोअर्स झालेत.

याबाबत प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी म्हणाले, “या माध्यमात राहून खूप आनंद झाला. चर्चा, वादविवाद, अंतर्दृष्टी, लोकांचे आशीर्वाद, रचनात्मक टीका आणि बऱ्याच गोष्टींचा आनंद घेत आहे. भविष्यात सुद्धा अशाच आकर्षक वेळेची वाट पाहत आहे.” समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (१९.९ मिलियन), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (७.४ मिलियन), राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे २.९ मिलियन फॉलोअर्स आहेत.

- Advertisement -

एक्सवर नरेंद्र मोदींची लोकप्रियता लक्षात घेता, जगभरातील नेते नरेंद्र मोदींसोबत सोशल मीडियावर व्यस्त राहण्यास उत्सुक आहेत. कारण त्यांच्यासोबत जोडल्याने त्यांचे स्वतःचे फॉलोअर्स, व्ह्यू आणि पोस्ट्स लक्षणीयरीत्या वाढतात. अलीकडे इटली आणि ऑस्ट्रियामध्येही हे दिसून आले.

या सेलिब्रेटींना मोदींनी टाकले मागे
X वर विराट कोहलीपेक्षा पंतप्रधान मोदी अधिक लोकप्रिय आहेत.केवळ राजकारणीच नाही तर, पंतप्रधान मोदींचे जगभरातील स्पोर्टिंग आयकॉन्सपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. यात विराट कोहली (६४.१ मिलियन), ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार जूनियर (६३.६ मिलियन), अमेरिकन बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स (५२.९ मिलियन ) यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी टेलर स्विफ्ट (९५.३ मिलियन), लेडी गागा (८३.१ दशलक्ष) आणि किम कार्दशियनचे (७५.२ मिलियन ) फॉलोअर्स आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या