Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याGujarat Election 2022 : पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Gujarat Election 2022 : पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई | Mumbai

गुजरात विधानसभेच्या निवडणुकांसाठी (Gujarat Assembly Elections) दोन टप्प्यात मतदान (Voting) होत असून पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ८ वाजेपासून सुरूवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) अहमदाबादच्या राणीपमध्ये मतदान केले…

- Advertisement -

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी आज मतदान होत असून ८३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांच्या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, गेल्या निवडणुकीत अहमदाबादमधील (Ahmedabad) ९३ पैकी भाजपाने (BJP)५१, तर काँग्रेसने (Congress) ३९ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यावेळी आप (AAP) सुद्धा गुजरातमध्ये निवडणूक लढवत असल्याने याठिकाणी चुरशीची लढत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या