Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या"ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी…"; पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

“ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी…”; पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

नवी दिल्ली | New Delhi

देशासह राज्यात पहिल्या चार टप्प्यातील मतदान (Voting) पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधक प्रचारसभांमधून एकमेकांवर तोफ डागत आहे. पाचव्या टप्प्यानंतर उर्वरित टप्प्यात अनेक मतदारसंघांमध्ये हायप्रोफाईल लढती होणार असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याही मतदारसंघाचा समावेश आहे. अशातच काल (मंगळवारी) पंतप्रधान मोदींनी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी एका मुलाखतीमध्ये बोलतांना विरोधकांकडून केला जात असणाऱ्या हिंदू विरुद्ध मुस्लिम या आरोपांवरून मोठे विधान केले आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “लोकांनी अधिक मुलांना जन्म देऊन नये, असे आवाहन मी करतो तेव्हा मी मुस्लिमांविषयी (Muslim) बोलतोय, असे त्यांना का वाटते. मला हे समजत नाही. गरीब हिंदू (Hindu) कुटुंबातही ही समस्या आहे. ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याएवढे सक्षम नाहीत. मी कधीच हिंदू-मुस्लिम नाव घेतले नाही. त्यामुळे ज्यादिवशी मी हिंदू-मुस्लिम करायला सुरूवात करेन, त्यादिवशी मी सार्वजनिक जीवनात राहण्यायोग्य राहणार नाही. मी कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण होऊ देणार नाही, हे माझे वचन आहे, असे मोदींनी स्पष्ट केले. तसेच ‘सबका साथ सबका विकास’ हा माझा मंत्र आहे. काही चुकीचे वाटत असेल तर मी त्यावर लगेच बोलतो,” असेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, “मी ज्याठिकाणी लहानचे मोठे झालो, तिथे अनेक मुस्लिम राहतात. लहानपणीपासूनच माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत. माझ्या घरात आजूबाजूला सर्व मुस्लिम कुटुंब आहेत. आमच्या घरातही ईद साजरी होते. ईदच्या दिवशी माझ्या घरी जेवण बनवले जात नव्हते. कारण मुस्लिम बांधवांकडून आम्हाला जेवण मिळायचे. मोहरम सणाच्या दिवशीही मी तजिया खालून जात होतो. त्यावेळी अनेक मित्र माझ्यासोबत असायचे. मात्र २००२ गोध्रा घटनेनंतर माझी प्रतिमा जाणूनबुजून मलीन करण्यात आली. अहमदाबादमधील मानेक चौक येथे एक सर्व्हे करण्यात आला होता. तिथे सर्व व्यापारी मुस्लिम आणि ग्राहक हिंदू होते. तिथे कुणीही माझ्याविषयी चुकीचे बोलले तरी दुकानदाराने त्यांना थांबवून मोदींविरोधात एक शब्दही बोलू नका. आमची मुलं मोदींमुळे शाळेत जात आहेत, असे सांगितल्याचे मोदींनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या