नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मुंबई महापालिकेत भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. ठाकरेंची ३० वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपाने सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. महाराष्ट्रातील एकूण विजायबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपाचे अभिनंदन केले आहे. तसेच काँग्रेसवर ही टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मोठ्या शहरातील महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल आला आहे. जगातील सर्वांत मोठ्या शहरापैकी एक असलेल्या मुंबईत जनतेने भाजपाला रेकॉर्डब्रेक जनादेश दिला आहे” असे म्हणताच उपस्थित प्रेकक्षांना जल्लोष केला. तेव्हा मोदी म्हणाले, यश मुंबईत मिळालेय पण उत्साह आसामच्या काजिरंगमध्ये पाहायला मिळतोय.”
काँग्रेसच्या निगेटिव्ह पॉलिटिक्स नाकारत आहे
तसेच पुढे बोलताना मोदी म्हणाले, ‘काँग्रेसची निगेटिव्ह पॉलिटिक्स देश नाकारत आहे. ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, तिथे आज ते चौथ्या-पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत’,काँग्रेसने देशातील नागरिकांचा विश्वास गमावला आहे”, अशी टीका मोदींनी केली.
भाजप देशातील मतदारांची पहिली पसंती
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टी ही आज देशातील मतदारांची पहिली पसंती ठरत आहे. बिहारमध्ये 20 वर्षांनंतरही भाजपाला विक्रमी मते, मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाला मोठा जनादेश आणि केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये भाजपाचा पहिला महापौर बसला आहे. देशाचा मतदार आज गुड गव्हर्नन्स, विकास आणि वारशाचे जतन करणाऱ्या राजकारणाला पसंती देतो,’ असे मोदी म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




