Tuesday, May 21, 2024
Homeदेश विदेश'मूर्खो का सरदार' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर जोरदार टीका

‘मूर्खो का सरदार’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर जोरदार टीका

मध्य प्रदेश | Madhya Pradesh

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर (Congress leader Rahul Gandhi) जोरदार हल्लाबोल केला आहे. दोन्ही नेते प्रचारसभेदरम्यान एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बैतूलच्या प्रचारसभेमध्ये बोलताना राहुल यांचा उल्लेख ‘मूर्खो का सरदार’ असा केला आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमधील एका सभेत बोलताना म्हटलं होतं की आपण ‘मेड इन चाइना’ वस्तू मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. पण, आता आपल्याला ‘मेड इन मध्य प्रदेश’ वस्तू निर्माण करायच्या आहे. राहुल यांच्या या वक्तव्याचा मोदी यांनी समाचार घेतला. मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये राहुल गांधींना टोला लगावत मोदी म्हणाले की, “काँग्रेसचे एक महाज्ञानी आजकाल मध्य प्रदेशात फिरत आहेत. महाज्ञानीसारख्यांच्या विचारसरणीने देश उद्ध्वस्त केला आहे.”

“जिथे जिथे काँग्रेस आली, तिथे विनाश झाला. काँग्रेस शेतकरी, तरुण आणि महिलांची शत्रू आहे. ती जे काही करते, ते एका कुटुंबाच्या नावावर करते. काँग्रेसला तुमच्या कुटुंबाची पर्वा नाही. आज संपूर्ण मध्य प्रदेश म्हणत आहेत की, पुन्हा एकदा भाजपाचे सरकार.”

मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला, ते यावेळी म्हणाले, अरे मूर्खो के सरदार, कोणत्या जगात राहतात हे लोक. आपल्या देशाची उपलब्धी न पाहण्याचा मानसिक आजार काँग्रेसला झाला आहे. यांनी विदेशातील कोणते चष्मे घातलेत माहिती नाही. त्यांना आपल्या देशाचा विकास दिसतच नाही.

पंतप्रधान मोदी यांनी देशातील मोबाईल उत्पादनाची माहिती सभेतील लोकांना दिली. सत्य हे आहे की भारत मोबाईलची निर्मिती करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. काँग्रेसच्या काळात देशात २० हजार कोटी रुपयांचे मोबाईल बनत होते. पण, आज भारतात साडे तीन लाख कोटींचे मोबाईल बनत आहेत. जवळपास १ लाख कोटी किंमतीचे मोबाईल दुसऱ्या देशांना निर्यात केले जात आहेत. आज देशात मोठ्या प्रमाणात लोक स्वदेशी वस्तू खरेदी करत आहेत, असं ते म्हणाले.

पुढे मोदी म्हणाले, “जिथे काँग्रेस सत्तेवर आहे, तिथे फक्त लूट, लूट आणि फक्त लूट हाच त्यांचा उद्देश आहे. मोदींना लॉकर्स कसे माहीत आहेत याची त्यांना चिंता आहे. लॉकर्स उघडले जात आहेत आणि पैशांचे ढीग बाहेर पडत आहेत आणि हे खरे सोने आहे.” “भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि काँग्रेस कोणत्याही राज्याला उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशला खूप सावध राहावे लागेल. जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, इतिहास माहीत असणं महत्त्वाचे आहे. फक्त तुमच्या पालकांना विचारा की ते कोणत्या प्रकारचे जीवन जगत होते” असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या