नाशिक | Nashik
काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी संघर्ष करण्याचा धोकादायक खेळ खेळला जातोय. हा खेळ यासाठी आहे कारण काँग्रेस कधीही दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना पुढे येताना पाहू शकत नाही. हाच काँग्रेसचा इतिहास आहे. स्वातंत्र्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना, वंचितांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. मात्र नेहरू त्याला विरोध करत होते. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली.यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकला माझा नमस्कार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पहिल्या दिवशी मला नाशकात येण्याचे सौभाग्य मिळाले. अयोध्येत प्राणप्रतिष्ठे आधी ११ दिवसांच्या अनुष्ठानाची माझी सुरुवात नाशिकमधून करण्यात आली होती. काळाराम मंदिरात मला सेवेचा लाभ मिळाला. विकसित महाराष्ट्र, भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. मी पाहतोय नाशकात जनसमूह, महाराष्ट्र बोलतोय भाजप महायुती आहे तर गती आहे, राज्याची प्रगती आहे.
सशक्त भारतात नाशिकची महत्वाची भुमिका
महायुती सरकारने विकासाच्या अजेंड्यावर नाशिकला मोठे महत्त्व मिळाले आहे. हायवे बनत आहे, वाहतूक व्यवस्था होत आहे. २०२६ च्या कुंभमेळ्यात देखील याचा फायदा होईल. नाशिकमधील आयटी पार्क रोजगार तयार करेल. नाशिक डिफेन्स क्षेत्रात मोठे केंद्र देखील बनतोय. नाशकात सुरक्षेची उपकरणे बनवली जात आहेत. नाशिक सशक्त भारतात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. काँग्रेस आणि आघाडीवाले लोक आहेत, ते देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिफेन्समध्ये कमकुवत करण्यासाठी एचएएलसंदर्भात खोटा प्रचार केला. धरणे आंदोलन केले, कर्मचाऱ्यांना भडकवले. मात्र एचएएल रेकॉर्ड ब्रेक कामे करत आहे. नाशिक त्याचे परिणाम बघत आहे.
डबज इंजिन सरकारमध्ये विकासाची गती डबल होते. योजनांचा लाभ पण डबल होता. येथे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान, नमो शेतकरी सन्मान निधी मिळत आहे. वर्षाला बारा हजारांची मिळणारी मदत वाढवून पंधरा हजार करण्यात येणार असल्याचे मोदी म्हणाले. तसेच मी कांदा उत्पादकांची भावना समजतो. त्यासाठी कांदा निर्यातीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
येथे सोयाबीन, कापूस, धान आणि दुधाचे उत्पादन घेतले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्रँडिंग वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. इथेनॉल खरेदीसाठी शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षांत सुमारे ८० हजार कोटी रुपये मिळाले आहेत. देशाचा पैसा पेट्रोल घेण्यासाठी विदेशात जायचा. आता ते पैसे माझ्या देशातील शेतकऱ्यांना मिळत आहेत. ते म्हणाले की, येथील कांदा शेतकऱ्यांच्या भावना मला समजतात. त्यामुळे कांद्याची निर्यात सुलभ करण्यासाठी धोरणे बदलण्यात आली आहेत.
पंतप्रधान मोदी महाविकास आघाडीवर टीका करत म्हणाले, महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांचे रुप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेते जनतेला लुटण्यासाठी राजकारणात आले आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “ ”महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेने त्यांचं अडीच वर्षांचे शासन बघितले आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटले. त्यांनी राज्यातील मेट्रो प्रकल्प बंद केले, वाढवण बंदराचे काम थांबवण्याचा प्रयत्नही महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आला. तसेच समृद्धी महामार्गाला विरोध केला, अशा नेत्यांपासून आता महाराष्ट्रातील जनतेने सावध होण्याची गरज आहे.
काँग्रस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळे होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूंचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेसकडून जाती जातींमध्ये वाद लावण्याचा खेळ खेळला जात आहे. कारण काँग्रेस कधीच दलित, मागासवर्गीयांना पुढे जाताना पाहू शकत नाही. शोषित आणि वंचितांना आरक्षण मिळावे यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले होते. पण नेहरू कोणत्याही किंमतीवर दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना आरक्षण देऊ नये या भूमिकेवर ठाम होते. मोठ्या कष्टाने दलित आणि आदिवासींसाठी आंबेडकरांनी आरक्षण दिले.
नेहरूंनंतर इंदिराजी आल्या. त्यांचाही उद्देश होता एससी, एसटी, ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळू नये. ते नेहमी कमजोर रहावेत असे वाटत होते. राजीव गांधींचाही विचार घराण्यापेक्षा वेगळा नव्हता. त्यांनी उघडपणे या आरक्षणाचा विरोध केला होता. हा समाज मजबूत झाला तर त्यांचे राजकीय दुकान बंद होईल अशी भीती होती. राजीव गांधींनंतर या कुटुंबाची चौथी पिढी आहे. त्यांचा एससी, एसटी ओबीसी समाजाच्या एकतेला तोडण्याचा उद्देश आहे. असा समाज वेगवेगळ्या जातीत विखुरलेला रहावा अशी त्यांची इच्छा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा