नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता.यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यानंतर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची (India) बाजू मांडत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद ही पाकिस्तानची विचार करून तयार केलेली रणनीती आहे. जर काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचे ऐकले असते तर ७५ वर्षांपासून सुरू असलेल्या दहशतवादी घटना केव्हाच थांबल्या असत्या” असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मोदी हे गुजरात दौऱ्यावर (Gujarat Tour) असून, त्यांनी गांधीधाम येथे एका सभेला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले की, “जेव्हा १९४७ साली देशाची फाळणी झाली, तेव्हा काही साखळदंडातून मुक्तता व्हायला हवी होती. परंतु, हातातील बळ संपुष्टात आणण्यात आले. देशाचे तीन तुकडे करण्यात आले. त्याच रात्री पहिला दहशतवादी हल्ला काश्मीर खोऱ्यात करण्यात आला. देशाचा एक भाग दहशतवादाच्या बळावर पाकिस्तानने हडपला. त्याच दिवशी या दहशतवाद्यांना जन्माची अद्दल घडवायला हवी होती. सरदार पटेल यांची तेव्हा अशीच इच्छा होती की, जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात परत येत नाही, तोपर्यंत सैन्याने थांबता कामा नये. मागे हटता कामा नये. परंतु, सरदार पटेल (Sardar Patel) यांचे ऐकले नाही. याच दहशतवाद्यांनी भारताला रक्तबंबाळ करण्याचे काम पुढे ७५ वर्ष सुरू ठेवले”, असे त्यांनी म्हटले.
#WATCH | Gandhinagar: Prime Minister Narendra Modi says "In 1947, when Maa Bharti was partitioned, 'katni chahiye thi zanjeerein par kaat di gayi bhujayein'. The country was divided into three parts. On that very night, the first terrorist attack took place in Kashmir. A part of… pic.twitter.com/f3cynvw0Tv
— ANI (@ANI) May 27, 2025
ते पुढे म्हणाले की, “शरीर कितीही स्वस्थ असले तरी एखादा काटा जरी टोचला तरी संपूर्ण शरीर अस्वस्थ होते. आता आम्ही ठरवलं आहे की हा काटा कायमचा काढून टाकायचा. ०६ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबण्यात आले. पण आता ‘ऑपरेशन सिंदूर’ जनबळावर पुढे नेण्यात येईल. जनतेने आता देशाच्या विकासात सहभागी व्हायला हवे. आपली जबाबदारी घ्यावी. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करायचे आहे. भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे, त्यासाठी जनतेने हातभार लावावा. परदेशी वस्तू वापरणार नाही असा संकल्प घ्यावा”, असे आवाहनही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केले.