Sunday, September 22, 2024
Homeदेश विदेशपरीक्षेचं टेन्शन येतंय? पंतप्रधान मोदींनी विद्यार्थांना दिला 'हा' सल्ला

परीक्षेचं टेन्शन येतंय? पंतप्रधान मोदींनी विद्यार्थांना दिला ‘हा’ सल्ला

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सोशल मीडियावरुन सहभागी झाले….

नरेंद्र मोदींनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हटले की, परीक्षेचा अभ्यास करताना योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. आत्मनिरीक्षण करा, आपले लक्ष्य ठरवा आणि त्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. जीवनात शॉर्टकट कधीही घेऊ नका. जर कुणी शॉर्ट घेत असेल तर घेऊद्या. तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा, असा सल्ला मोदींनी विद्यार्थांना दिला आहे.

Visual Story : …म्हणून धर्मवीर आनंद दिघेंनी नगरसेवकाच्या कानशिलात लगावली

आपल्या क्षमतेवर लक्ष केंद्रित केले तर कोणताही तणाव होणार नाही. आयुष्याच्या स्टेशनवरून एक गाडी गेली तर दुसरी येईल. कोणतीही परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नसतो. ताणतणावातून मुक्त होण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. निकालाचा ताण मनावर घेण्याची गरज नाही, असा संदेश त्यांनी दिला.

ऐन कडाक्याच्या थंडीत ‘तो’ पुन्हा येणार? महाराष्ट्रात कुठे बरसणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या