नवी दिल्ली | New Delhi
काँग्रेस आणि भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्यामुळे राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबतचे गंभीर आरोप केले आहेत. या दाव्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘पंतप्रधान मोदी माझा फोन टॅप करत आहेत’, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ काँग्रेसच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मात्र, फोन टॅपिंगच्या आरोपाला स्वतंत्र अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. राहुल गांधी यांच्या आरोपावर अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
राहुल गांधींनी काय म्हंटले आहे?
“माझ्या सर्व आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. पण माझ्या फोनचं पंतप्रधान टॅपिंग करत आहेत. माझ्या फोनमध्ये विविध माहिती आणि पुरावे आहेत, जे सर्व आरोपांना पुष्टी देऊ शकतात.”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
“पुरावा इथेच या फोनमध्ये आहे. पंतप्रधानांना हे माहीत आहे कारण त्यांनी माझा फोन टॅप केला आहे. जेव्हा ते समोरासमोर चर्चेसाठी तयार होतील, तेव्हा सर्वांसमोर हे स्पष्ट होईल की कोण परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर काम करतंय? खरा देशद्रोही कोण आहे आणि किती काळापासून देशद्रोहाच्या कामात सामील आहे. अशा अनेक गोष्टी ज्या मला माहीत आहेत आणि ज्या माझ्या फोनमध्ये आहेत”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
मोदी जी, अपने ही गोदी मीडिया के दिवाली मिलन में भी टेलीप्रॉम्प्टर?
लोग आपके, मंच आपका, माहौल आपका – फिर भी स्क्रिप्ट चाहिए थी। लगता है दबाव में घबरा गए हैं।
ख़ैर, कोई बात नहीं। मुझसे बहस में भी टेलीप्रॉम्प्टर ले आइए, जज भी अपनी पसंद का बैठा लीजिए।
बस आइए तो सही। देश जानना चाहता है – असली देशद्रोही कौन है?— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 13, 2026
इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी’ सत्रादरम्यान राहुल गांधींना अनेक प्रश्न विचारण्यात आले. भाजप संसदेत चर्चेसाठी तयार असताना ते सार्वजनिक चर्चेचा आग्रह का धरत आहेत, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, त्यांना लोकसभेत बोलण्याची परवानगी नव्हती आणि त्यांचा मायक्रोफोन बंद करण्यात आला होता.
नरेंद्र मोदी मेरे साथ आमने-सामने बैठकर डिबेट करें।
मै गारंटी देता हूं- मेरे साथ one-on-one डिबेट के बाद नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नहीं रह पाएंगे।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi https://t.co/QdLEdy725C— Congress (@INCIndia) November 13, 2026
कृषी विधेयक असेल, एसआयआर, चीन, जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा असेल किंवा एपस्टीनचा मुद्दा असेल अशा अनेक विषयांवर तुम्ही मला बोलताना पाहिलं असेल, पण मला बोलू दिलं नाही. मात्र, आता मला समोरासमोर चर्चा हवी आहे. दोन्ही नेत्यांनी भाषणं देण्याऐवजी एकमेकांना थेट प्रश्न विचारावेत आणि आव्हाने द्यावीत. माझी इच्छा आहे की नरेंद्र मोदी माझ्यावर आरोप करतील आणि मी त्यांच्यावर आरोप करेन. पण त्यांनी यावं, एक टेबल असेल, एका बाजूला मोदीजी असतील आणि दुसऱ्या बाजूला मी असेन. जर या चर्चेचे पंच म्हणून गौतम अदाणी किंवा मोहन भागवत यांची निवड केली तरी मला काहीही हरकत नाही. पण मी खात्री देतो की माझ्यासोबत समोरासमोर चर्चा झाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर राहू शकणार नाहीत”, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला.




