Saturday, September 21, 2024
Homeदेश विदेशशूरवीरांचा असा ही सन्मान! अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे

शूरवीरांचा असा ही सन्मान! अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे

दिल्ली | Delhi

- Advertisement -

नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज ( २३ जानेवारी ) १२६ जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त अंदमान-निकोबार बेटावरील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं.

तसेच, अंदमान-निकोबारवरील २१ बेटांचं नामकरणही पंतप्रधान मोदींनी केलं आहे. या २१ बेटांना आता परमवीर चक्र प्राप्त विजेत्या सैनिकांच्या नावाने ओळखलं जाणार आहे. यात भारत-चीन युद्दात पायाने मशीनगन चालवणाऱ्या मेजर शैतान सिंह, कारगील युद्दाचे हीरो कॅप्टन विक्रम बत्रा व मनोजकुमार पांडेय यांचे नाव देण्यात आले आहे. या बेटांना अद्याप नावे नव्हती. आतापर्यंत ते फक्त अंदमान निकोबार बेटांच्या नावाने ओळखले जात होते.

‘या’ २१ परमवीर चक्र विजेत्या सैनिकांची नावं बेटांना देण्यात आली…

मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि मानद कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करम सिंग, एमएम, सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग, कॅप्टन जी. एस. सलारिया, लेफ्टनंट कर्नल (तत्कालीन मेजर) धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, सीक्यूएमएच. अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोन, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मेजर कुमार बत्रा, लेफ्टनंट कुमार बत्रा (सुभेदार) तत्कालीन रायफलमन) संजय कुमार आणि सुभेदार मेजर निवृत्त (मानद कॅप्टन) ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव या परमवीर चक्र विजेत्यांची नावे अंदमान आणि निकोबारमधील बेटांना देण्यात आली आहेत.

दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले, ही २१ बेटं आता परमवीर चक्र विजेत्यांच्या नावानं ओळखली जाणार आहेत. येणाऱ्या पिढ्या हा दिवस स्वातंत्र्याच्या अमृताचा एक महत्त्वाचा अध्याय म्हणून लक्षात ठेवतील. ही बेटं आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी चिरंतन प्रेरणास्थान असतील. यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो.

पंतप्रधान पुढे म्हणाले, अंदमानची ही भूमीत पहिल्यांदाच आकाशात मुक्त तिरंगा फडकवला गेला. त्या अभूतपूर्व उत्कटतेचे आवाज आजही सेल्युलर जेलच्या कोठडीतून अपार वेदनांसोबत ऐकू येतात. स्वातंत्र्यानंतर नेताजींना विसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. खरं तर नेताजींच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी हा दिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

परमवीर चक्र म्हणजे काय?

परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत 21 परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले 14 पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. प्रदान केलेल्या 21 परमवीर चक्र पुरस्कारांपैकी 20 भूदलाच्या (Indian Army) सैनिकांना आणि 1 वायुदलाच्या (हवाई दल / Indian Air Force) सैनिकाला देण्यात आला आहे.

ग्रेनेडियर्स रेजिमेंट आणि गोरखा रायफल्सच्या प्रत्येकी 3 सैनिकांना तर शीख रेजिमेंट, कुमाऊॅं रेजिमेंट, जम्मू काश्मीर रायफल्स आणि द पूना हॉर्सेस यांच्या प्रत्येकी 2 सैनिकांना परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. परवीर चक्र विजेत्यांमध्ये लेफ्टनंट अर्देशर तारापोर हे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या