Sunday, November 17, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान मोदींच्या पर्सनल वेबसाईटचे ट्विटर अकाऊंट हॅक

पंतप्रधान मोदींच्या पर्सनल वेबसाईटचे ट्विटर अकाऊंट हॅक

दिल्ली Delhi

जुलै महिन्यामध्ये अनेक प्रमुख व्यक्तींचे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. यात बिल गेट्स, एलोन मस्क, मायकेल ब्लूमबर्ग आणि अॅपल यांचा समावेश होता. यांच्या हॅक झालेल्या अकाऊंटवर बिटकॉइन घोटाळ्यासंबंधित मेसेजेस पाहायला मिळाले होते. त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. pm narendra modi twitter account hack

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हे अकाऊंट मोदींच्या पर्सनल वेबसाईटशी संलग्न आहे. याबाबत कंपनीला कल्पना आली असून अकाऊंट सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने कंपनीने पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे, अशी माहिती ट्विटरकडून देण्यात आली आहे. मोदींच्या ट्विटर अकाऊंटला 2.5 मिलियन्स पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतर पीएम नॅशनल रिलीफ फंडमध्ये (pm national relief fund) दान करण्याचे आवाहन फॉलोअर्सला करण्यात आले आहे. Cryptocurrency द्वारे तुम्ही हे दान करु शकता असे ट्विट्स अकाऊंटवर दिसत आहे. “हे अकाऊंट जॉन विक (John Wick, [email protected]) यांनी हॅक केलं असून आम्ही पेटीएम मॉल हॅक केलेले नाही,” असे अजून एक बोगस ट्विट अकाऊंटवर दिसत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या