Wednesday, December 4, 2024
Homeदेश विदेशनव्या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा नेहरुंची आठवण काढली; सेंगॉल वरुन म्हणाले...

नव्या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा नेहरुंची आठवण काढली; सेंगॉल वरुन म्हणाले…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आज सगळ्या खासदारांनी संसदेच्या (New Loksabha) नव्या वास्तूत प्रवेश केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगॉलचा (Sengol) उल्लेख करत पंडित नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) यांचा स्पर्श त्या सेंगॉलला झाला आहे असे म्हटले. यावेळी मोदींनी पवित्र सेंगोलचा उल्लेख करताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज पुन्हा एकदा आठवण काढली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या घडामोडींना उजाळा दिला.

- Advertisement -

नव्या लोकसभेतून पहिले संबोधन करत असताना त्यांनी पंडित नेहरु, देशाची ७५ वर्षांची परंपरा यावर आपले भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेव्हा सेंगॉलची पूजा करण्यात आली आणि तो सेंगॉल लोकसभेत काचेच्या पेटीत ठेवण्यात आला तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. आज लोकसभेतल्या भाषणात त्यांनी या घटनेचा उल्लेख केला नाही. उलट पंडित नेहरुंच्या हस्तस्पर्शाने पावन झालेला सेंगॉल आपल्याला मार्गदर्शक ठरेल असे म्हटले आहे.

राज्यात महिला खरचं सुरक्षीत आहे का? महिला अत्याचाराची आकडेवारीतून धक्कादायक माहिती आली समोर

नेहरुंच्या हस्ते पुजाविधी करुन स्वातंत्र्याचा पर्वाला प्रारंभ झाला होता. याद्वारे भूतकाळातील एक खूपच महत्वाची घडामोडीशी हा सेंगोल आपल्याला जोडतो. तमिळनाडूच्या महान परंपरेचा तो प्रतिक आहेच पण देशाला जोडणारा आणि एकतेचा देखील तो प्रतिक आहे. त्यामुळे कायम जो पवित्र सेंगोल पंडीत नेहरुंच्या हातात शोभून दिसत होता, तो आज आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे. यापेक्षा मोठी गर्वाची गोष्ट काय असेल?

आज आपल्या या भवनात सगळ्या गोष्टी नव्या आहेत. अशातच एक महत्त्वाची परंपरा असलेली गोष्ट आहे. ती गोष्ट नवी नाही ती जुनीच आहे. स्वातंत्र्याच्या पहिल्या किरणाचा साक्षीदार असलेली ती गोष्ट आहे ती आज आपल्यात आहे. ती गोष्ट दुसरी तिसरी काहीही नसून संसदेत असलेला सेंगॉल आहे. आपल्या समृद्ध इतिहासाला जोडणारा हा सेंगॉल आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या