नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वनतारा येथील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचे उद्घाटन केले. वनतारा येथे दोन हजारांहून अधिक प्रजाती आहेत आणि दीड लाखाहून अधिक रेक्यू केलेल्या, जीव धोक्यात असलेल्या प्राण्यांचे ते ठिकाण आहे. या काळात पंतप्रधानांनी अनेक सुविधांचा आढावाही घेतला. यादरम्यान, पंतप्रधान आशियाई सिंहाचे शावक, पांढरे सिंहाचे शावक, दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या हिम बिबट्याचे शावक, कॅराकल शावकांसह अनेक प्रजातींसोबत खेळताना दिसले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनतारा येथील प्राण्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. तसेच विविध ठिकाणाहून सुटका करण्यात आलेल्या प्राण्यांच्या विविध प्रजातींना भेट देऊन त्यांना खायला दिले. पंतप्रधानांनी वनतारा येथील वन्यजीव रुग्णालयाला भेट दिली. यात प्राण्यांसाठी एमआरआय, सीटी स्कॅन, आयसीयू आणि इतर सुविधा आहेत. त्यात वन्यजीव भूल, हृदयरोग, नेफ्रोलॉजी, एंडोस्कोपी, दंतचिकित्सा, अंतर्गत औषध यासह अनेक विभाग आहेत.
वनतारा येथे पंतप्रधान मोदी हे आशियाई सिंहाचा छावा आणि इतर प्राण्यांच्या प्रजातींच्या पिल्लांशी खेळताना दिसले. त्यांनी छाव्यांना कुशीत घेतले, मायेने त्यांच्या अंगावरून हात फिरवला, बॉटलने दूध पाजले आणि प्रेमाने भरवले. मोदींनी ज्या पांढऱ्या रंगाच्या सिंहाच्या छाव्याला भरवले त्याचा जन्म वनतारामध्येच झाला आहे. त्याच्या आईला रेस्क्यू करून वनतारामध्ये आणण्यात आले होते.
एकेकाळी भारतात मुबलक प्रमाणात आढळणारे कॅराकल आता दुर्मिळ होत चालले आहेत. लोकसंख्या वाढवण्यासाठी आणि अखेर त्यांना जंगलात सोडण्यासाठी संवर्धन प्रजनन कार्यक्रमाचा भाग म्हणून वनतारा येथे कॅराकल पक्ष्यांना बंदिवासात प्रजनन केले जाते. आणि नंतर त्यांना जंगलात सोडले जाते.
पंतप्रधानांनी वनतारात फेरफटका मारत निसर्गाचा आनंद घेतला. सिंह, बिबट्या, झेब्रा यासह अनेक प्राण्यांना पाहिले, धीरूभाई अंबानी संशोधन प्रयोगशाळेचीही पाहणी केली. हत्ती, जिराफ यांना प्रेमाने फळं खाऊ घातली. यानंतर ते पक्षी वॉर्डमध्ये पोहोचले. मोदींचा वनतारातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून तो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा