Saturday, April 18, 2026
Homeक्रीडाVinesh Phogat Disqualified : विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर PM मोदी काय...

Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर PM मोदी काय म्हणाले?

दिल्ली । Delhi

भारताला खूप मोठा धक्का बसला आहे. पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) स्पर्धेतूनत आज सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) ५० किलो वजनी गटातून फायनलसाठी पात्र ठरली होती.

- Advertisement -

विनेशचा (Vinesh Phogat) फॉर्म पाहता तिच्याकडून सुवर्ण पदक निश्चित मानलं जात होतं. सगळ्या देशात प्रचंड उत्साह होता. पण आज दुपारी १२ च्या सुमारास विनेश अपात्र ठरल्याची (Vinesh Phogat Disqualified ) बातमी आली. तिच वजन मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त होतं. म्हणून विनेशला अपात्र ठरवण्यात आलं. या बातमीने सगळ्या भारतामध्ये खळबळ उडाली आहे.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्वीट करत विनेशचं सांत्वन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘विनेश, तू चॅम्पियनचे चॅम्पियन आहोत. तुम्ही भारताचा अभिमान आहात. तुम्ही प्रत्येक भारतीयांसाठी आदर्श आहात. फार दु:खद प्रकार आहे. मी शब्दांतून भावना व्यक्त करू शकलो असतो. मला विश्वास आहे की, तुम्ही मोठ्या दिमाखात पुन्हा पदार्पण कराल. आम्ही तुमच्यासोबत आहोत’.

उपांत्य फेरीत विनेश फोगाटने क्यूबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा ५-० असा पराभव केला. तिच्या श्रेणीतील पहिल्या सामन्यात तिचा सामना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि जागतिक विजेता जपानच्या युई सुसाकीशी झाला. विनेशने सुसाकीचा ३-२ असा पराभव केला.

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai यंदाच्या जनगणनेच्या कामासाठी पुन्हा एकदा शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. जनगणना करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून राज्य सरकारने यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या...