नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उद्घाटन केले. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचा आहे, असे वक्तव्य केलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७६०० कोटी रुपयांच्या विकासकामाचे कॉन्फरसिंगद्वारे उद्घाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. त्याशिवाय महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचा निर्धार केलाय.
काय म्हणाले मोदी?
“हरियाणाच्या निकालामुळे देशाचा मूड कळला आहे. दोनवेळा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सलग तिसऱ्या वेळी जिंकून येणे ऐतिहासिक आहे. काँग्रेसची पूर्ण इकोसिस्टम, शहरी नक्षलवादी गँग लोकांना संभ्रमात टाकत आहे. काँग्रेसचे सर्व षडयंत्र उद्ध्वस्त झाले. अर्बन नक्षलबद्दल लोकामध्ये खोटे पसरवले, पण त्यांनी काँग्रेस आरक्षण हिसकावून मताचे ध्रुवीकरण होत असल्याचे लक्षात आले. काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवले. हरियाणा भाजपच्या योजनांमुळे खूश आहे. वेगवेगळ्या पद्धतीने अडवण्याचे प्रयत्न केले. काँग्रेसच्या अर्बन नक्षल कटाचे शिकार झाले नाही. काँग्रेस समाजाला भ्रमित करण्याचे फॉर्म्युला आहे. मुस्लिम समाजालाही भीती दाखवा, हा काँग्रेसचा फर्म्युला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
काँग्रेसने सर्व प्रयत्न केले. काँग्रेस नेहमीच फूट पाडा आणि सत्ता मिळवा यावर चालली आहे. काँग्रसेने सातत्याने सिद्ध केलंय की काँग्रेस बेजबाबदार पक्ष बनला आहे. देशात फूट पाडण्यासाठी ते नवनवे योजना आखत आहेत. समाजात फूट पाडण्याकरता ते फॉर्म्युला आणत असतात. काँग्रेसचा फॉर्म्युला स्वच्छ आहे की मुस्लिमांना भीती घाला, त्यांचे वोट बँकेत रुपांतर करा. काँग्रेसच्या एकाही नेत्याने म्हटले नाही की मुस्लीमांमध्ये किती जाती असतात. मुस्लीम जातींची गोष्ट निघताच त्यांच्या तोंडावर कुलूप लागते. पण हिंदूची गोष्ट निघते तेव्हा त्यांची चर्चा जातीवरूनच सुरू होते. काँग्रेसची नीती आहे. काँग्रेसला माहीत आहे की हिंदूत जितकी फूट होणार तेवढाच त्यांचा फायदा होणार. हिंदू समाजात आग लावण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय”, अशी टीकाही नरेंद्र मोदी यांनी केली.
काँग्रेस द्वेषाची सर्वात मोठी फॅक्टरी बनत आहे. हे गांधीजींना स्वातंत्रतानंतर समजून घेतले होते. म्हणून महात्मा गांधींनी काँग्रेस विलीन करा असे म्हटले होते. काँग्रेस संपली नाही, मात्र देशाला संपवत आहे. महाराष्ट्र लोक हे ऐकणार नाही. हरियाणात भाजपचा विजय झाला. आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा