चंद्रपूर । Chandrapur
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी प्रचारसभेचा आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मोदींनी धुळ्यातून आपल्या निवडणूक प्रचारसभांना सुरुवात केली.
त्यावेळी, संविधान आणि जातीय राजकारणावरुन काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. तसेच, एक है तो सेफ है… असा नाराही मोदींनी दिला. त्यानंतर, आज चंद्रपूरमधील चिमूर मतदारसंघातून मोदींनी महायुतीसाठी प्रचारसभा घेतली. येथील सभेतून त्यांनी थेट महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, महाराष्ट्राचा विकास महाविकास आघाडीला शक्य नाही. विकासकामे थांबवणे यात काँग्रेसची डबल पीएचडी आहे. समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर, मेट्रो अशी अनेक विकासकामे थांबवण्याचं काम महाविकास आघाडीने केलं. महाविकास आघाडीत भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू आहेत. महाराष्ट्र लुटीचं लायसन्स पुन्ही त्यांना तुम्ही देणार का? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला.
पुढे बोलतांना मोदी म्हणाले, राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षणाविरोधात बोलतात. आपल्याला काँग्रेसच्या या षडयंत्राचं शिकार व्हायचं नाही. त्यामुळे आपण ‘एक राहू तर सेफ राहू’. जर तुमची एकता तुटली तर काँग्रेस सर्वात आधी तुमचं आरक्षण हिसकावून घेईल. काँग्रेसच्या शाही परिवाराची मानसिकता राहिली आहे की ते देशावर राज्य करण्यासाठी जन्मले आहेत. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने दलित, आदिवासींना पुढे येऊ दिलं नाही. आपल्याला काँग्रेस आणि त्यांच्या साथिदारांपासून सावध राहिलं पाहिजे, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.
चंद्रपूरने अनेक वर्षे नक्षलवाद सहन केला, अनेक तरुणांचे बळी गेले, त्यामुळे या भागात उद्योग येऊ शकले नाहीत. आम्ही नक्षलवादावर लगाम लागली, त्यामुळे या भागात आता उद्योग येत आहेत. करोडो लोकांना पीएम आवास योजनेचा लाभ मिळाला. देशातील 25 कोटी लोकं दारिद्र्याच्यारेषेबाहेर आले, या भागातील चिंनोर तांदुळाच्या उत्तम क्वालिटीचाही मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला.