मुंबई | Mumbai
गेल्या १० वर्षांमध्ये आमच्या सरकारच्या काळात भारतातील बँकिग व्यवस्थेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. स्वस्त मोबाईल फोन, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स असणारी जनधन खाती या त्रिवेणी संगमाने भारतात कमाल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४’ ला हजेरी लावली.
“भारतात सणाचा काळ आहे. मार्केटमध्येही उत्सवाचा माहोल आहे. मी वेगवेगळी प्रदर्शन पाहून आलोय. अनेक मित्रांशी बोलून आलोय. नवीन जग दिसतय मला. मी ग्लोबल फिनटेक फेस्टीव्हलच्या आयोजकांना शुभेच्छा देतो” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी मुंबईत आले आहेत. ते ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलत आहेत. “मोठ्या संख्येने परदेशातून पाहुणे आलेत. एकवेळ लोक भारतात यायचे, तेव्हा इथली सांस्कृतिक विविधता बघून हैराण व्हायचे, आता फिनेटकच वैविध्य पाहून हैराण होतात” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “एअरपोर्टपासून ते स्ट्रीट फूड, शॉपिंग पर्यंत सर्व फिनटेक क्रांती दिसतेय. मागच्या १० वर्षात फिनटेकमध्ये ३१ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक झालीय” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“काही लोकांनी भारतातील फिनटेक क्रांतीबाबत प्रश्न उपस्थित केले. जेव्हा सरस्वती माता बुद्धी वाटत होती, तेव्हा असे लोक वाटेत उभे होते. सध्या भारतात सणासुदीचा काळ आहे. नुकताच जन्माष्टमीचा सण साजरा झाला. लोक इतके खूश आहेत की त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि बाजारावरही झाला आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
कोरोनासारख्या संकटकाळातही भारत हा बँकिग व्यवस्था सुरळीत असणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक होता. जनधन बँक खाती हे महिला सबलीकरणाचे माध्यम झाले आहे. त्यामुळे महिलांना बचत आणि गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध झाला. मुद्रा योजनेच्या माध्यमातून तब्बल २७ ट्रिलियनची कर्जे देण्यात आली, याच्या ७० टक्के लाभार्थी या महिला आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
विरोधकांना टोला
पुढे ते असे ही म्हणाले, “मागच्या १० वर्षात फिनेटक स्टार्टअपमध्ये ५०० टक्के वाढ झालीय. स्वस्त मोबाइल, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन बँक खात्याने भारतात कमाल केलीय. काही लोक आधी संसदेत उभे राहून विचारायचे, स्वत:ला विद्धवान मानायचे, सरस्वती बुद्धी वाटत होती, तेव्हा ते रस्त्यात आधीच उभे होते” असा टोमणा पीएम मोदींनी मारला. “बोलायचे, विचारायचे भारताता बँक शाखा नाहीत, इंटरनेट नाहीय वीज नाहीय, रिचार्जिंग कुठे होणार? फिनेटक क्रांती कशी होणार? माझ्यासारख्या चहावाल्याला विचारायचे. आज बघा एक दशकात भारतात ब्रॉड बँड युजरची संख्या ६० मिलियन म्हणजे ६ कोटीने वाढून ९४ कोटी झाली. आज कदाचितच कोणी भारतीय असेल, ज्याच्याकडे डिजिटल आयडेंटी आधारकार्ड नाही” असे मोदी म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा