Thursday, June 20, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; 'या' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; ‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ आणि १५ नोव्हेंबरला दोन दिवसीस झारखंड दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना दिवाळी भेट देण्याची शक्यता आहे. पीएम किसान सम्मान निधी योजनेचा १५ वा हप्त्याचे यावेळी वाटप करणार आहे. एकूण ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये यावेळी जमा होणार आहेत.ट

पीएम किसान सम्मान योजनेतंर्गत आत्तापर्यंत १४ हफ्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. DBTमाध्यमातून त्यांच्या खात्यात २.६२ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. या कार्यक्रमा दरम्यान पीएम मोदी ‘प्रधानमंत्री विशेष कमजोर जनजातीय समूह (पीएम पीवीटीजी) मिशन’ लॉन्च करतील. पीएम पीवीटीजी मिशनसाठी जवळपास २४ हजार कोटी रुपयांच बजेट आहे. या मिशनमध्ये पीवीटीजी कुटुंब, रस्ते, दूरसंचार कनेक्टिविटी, वीज, सुरक्षित आवास या पायाभूत सुविधांसाठी योजना बनवल्या आहेत.

पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आत्तापर्यंत या योजनेचे १४ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे.

दरम्यान, किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केलं नसेल तर लगेच करुन घ्या. पीएम किसान योजनेचा पंधरावा हफ्ता उद्या म्हणजे १५ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या