केरळ | Kerala
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ दौऱ्यावर होते. त्यांनी केरळमधील तिरुअनंतपुरम येथील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पीएम मोदी यांनी असे विधान केले आहे की, ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता वाढली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना सांगू इच्छितो की, तुम्ही इंडिया ब्लॉकचे एक मजबूत आधारस्तंभ आहात. शशी थरूरही इथे बसले आहेत. आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडाणार आहे,”असे म्हणत मोदींनी टोला लगावला.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
PM मोदी विझिंजम बंदराच्या उद्घाटन समारंभात बोलताना म्हणाले की, ‘मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री विजयन येथे बसले आहेत. ते इंडिया आघाडीचे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. शशी थरूर देखील बसले आहेत. आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल. जिथे संदेश जायचा होता तिथे गेला आहे.” पीएम मोदींच्या या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात गौतम अदाणी यांच्या नावाचाही उल्लेख केला.
The Vizhinjam International Deepwater Multipurpose Seaport in Kerala is a significant advancement in India's maritime infrastructure. https://t.co/sUeQ5k7TK1
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2025
आद्य शंकराचार्यांनी चेतना जागृत केली
मोदी म्हणाले, “आज भगवान आदि शंकराचार्य यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात मला त्यांच्या जन्मभूमीत जाण्याचे भाग्य लाभले. आद्य शंकराचार्य यांनी केरळ सोडून देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठ स्थापन करून राष्ट्राची चेतना जागृत केली. मी त्यांना अभिवादन करतो.”
केरळला जागतिक सागरी नकाशावर स्थान मिळण्याची अपेक्षा
विझिनजम बंदर सुरू झाल्यामुळे, केरळला जागतिक सागरी नकाशावर एक महत्त्वाचे स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. हे बंदर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शिपिंगमध्ये भारताच्या भूमिकेत एक गेम चेंजर ठरू शकते.
Inauguration of the Vizhinjam Port in Kerala is significant for India’s maritime sector. People have been waiting for this port for many years. It will boost trade, commerce and will be particularly beneficial for Kerala’s economy.
Here are glimpses from today’s programme in… pic.twitter.com/T1QQ00AvSA
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2025
मोदींकडून गौतम अदाणींचा उल्लेख
पंतप्रधान मोदींनी नाव न घेता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. गौतम अदाणी यांच्या उल्लेख करत ते म्हणाले, “येथे गौतम अदानीही उपस्थित होते. अदाणी यांनी जेवढे चांगले बंदर येथे तयार केले आहे, तेवढे चांगले बंदर तर गुजरातमध्येही तयार केलेले नाही.”
राजकीय प्रतिस्पर्धी अस्वस्थ
काँग्रेस खासदार शशी थरूर हे काँग्रेसचे तिरुवनंतपुरम लोकसभेचे खासदार आहेत. जे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्सचे (इंडिया) एक प्रमुख सदस्य आहे. मोदींनी हे वक्तव्य जरी विनोदाने म्हटले असले तरी, राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ करण्याच्या उद्देशाने ते होते असे दिसून आले.
थरुर यांच्याकडून मोदींची प्रशंसा
रशिया-युक्रेन युद्धावर भारताची भूमिका आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी राजनैतिक चर्चा सुरू ठेवणे. यासह अनेक मुद्द्यांवर थरूर यांनी पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रशंसा केली. यानंतर मोदींनी हे भाष्य केले आहे.
खोल समुद्रातील हे बंदर भारतातील सर्वात मोठे बंदर विकासक अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) द्वारे विकसित केले आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पब्लिक -प्रायव्हेट पार्टनरशिप -PPP) मॉडेल अंतर्गत सुमारे 8,867 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण झाला. यशस्वी चाचणी झाल्यानंतर ४ डिसेंबर २०२३ साली या बंदराला व्यावसायिक कमिशनिंग प्रमाणपत्र मिळाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा