Tuesday, November 19, 2024
HomeUncategorizedनभाच चैतन्यदायी दान देणारे "रानकवी"

नभाच चैतन्यदायी दान देणारे “रानकवी”

मातीची नाळ जुळणारे आणि मातीची ओळख सांगणारे, ग्रामीण भागातील लोकांचे जीवन आपल्या साहित्यात रेखाटणारे साहित्यिक, कवी व चित्रपट लेखक अस नावलौकिक असणारे कवी, गीतकार ना. धो. महानोर ज्यांची मराठी साहित्य विश्वातील एक मोठे नाव अशी त्यांची ओळख होती.

ना. धो. महानोर यांचे पूर्ण नाव नामदेव धोंडो महानोर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी औरंगाबाद जिल्हयातील पळसखेड येथे झाला. आई वडील दुसर्‍यांच्या शेतात कामासाठी जात. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. महानोर थोरले. प्राथमिक शिक्षण पळसखेड झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी गावापासून 8-10 किलोमीटरवर शेंंदुर्णी येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले. येथेच महानोरांची कवितेशी ओळख झाली. त्यानंतर जळगावच्या मूळजी जेठा विद्यालयात त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला येथे त्यांना म.ना. अदवंत. राजा महाजन अशा थोर साहित्यीकांकडून त्यांना खूप प्रोत्साहन मिळाले.

- Advertisement -

जीवनाला असा आकार मिळत असतांना, त्यांच्या वडीलांनी जमीन विकत घेतल्यामुळे महानोरांना वडीलांच्या मदतीसाठी शिक्षण अर्धवट टाकून गावी वापस जावे लागले. आणि ते शेतीत रमले. लोकगीतांतील छंद-लय, जिवंत उत्स्फुर्तता, आपल्या मातीशी आणि बोलीभाषेच्या सहजतेशी नाते सांगणारी जिवंत शब्दकळा ही महानोरांच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये त्यांच्या ह्या खास संवेदनशीलतेतून स्वाभाविकपणेच आलेली आहेत. निसर्ग आणि स्त्री हे दोन विषय त्यांच्या कवितेचे केंद्रस्थान होते. कवितेत मातीशी जोडली नाती आहेत. वेदना संवेदना आहेत.

या नभाने या भुईला दान द्यावे,

आणि या मातीतून चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी शेती फळाला

जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

त्यांच्या कवितेत निसर्गाचे विविध रंग, गंध, ध्वनी आहेत. निसर्गाच्या स्पर्शाने फुललेला श्रृंगार आहे. महानोरांनी गद्य लेखणही भरपूर केलेले आहे. गांधारी ही कादंबरी, गपसप व गावाकडच्याा गोष्टी हे कथा संग्रह प्रसिद्ध आहे. याविवाय शरद पवार आणि मी, यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार, आनंदयोगी पु.ल. या पुस्तकांमधून त्यांनी महाराष्ट्रातील मोठी व्यक्तीमत्व यशस्वी उलगडण्याचा प्रयत्न केला.तरीही त्यांचे पहिले प्रेग कवितेवरच आहे असेच म्हणले पाहिजे. रानातल्या कविता या त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी कवितात त्यांचे प्रथम स्थान निर्माण केले. त्यांचे 11 कवितासंग्रह आणि अजिंठा हे खंडकाव्य प्रकाशित आहे. वही आणि पळसखेडची गाणी हे त्यांचे लोकगीतांचे संग्रहही प्रसिद्ध आहे. महानोरांनी असंख्य चित्रपट गीतेही लिहीली आहेत. जैत रे जैत, सर्जा, अबोली ई अनेक चित्रपटातील गीते त्यांनीच लिहीली आहेत.

महानोरांना लोकसाहित्याबद्दल खूप जिव्हाळा होता. आपल्या भागातील लोकगीत आणि लोककथांचा संग्रह करून त्यांचा परिचय महाराष्ट्राला करून दिला. वही हा मराठवाड्यातील लोकगीतांचा प्रकार होय. त्यांनी लिहीलेल्या वह्या या त्यांच्या वही या संग्रहात आहे. ज्याचबरोबर महानोारांनी मुक्तछंदही भरपूर लिहीले आहेत. अजिंठा तील गिल पारूची कथा मुक्तछंदातच आहे. शिवाय तिची कहाणी ही. असे त्यांच्या कवितेचे विविध पैलू आहेत.

ना. धों. महानोर यांनी गाथा शिवरायांची हे 20 गीतांचे गीतकाव्य लिहिले आहे. याबाबत त्यांनी 6 जूनला केलेली फेसबुक पोस्ट ही अखेरची पोस्ट ठरली आहे. त्यांनी फेसबुकपोस्टमध्ये म्हटले की, गाथा शिवरायांची हे 20 गीतांचे उत्कृष्ठ संगीतमय गीतकाव्य व ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंत 20 गीतांची मालिका प्रसिद्ध गायक-गायिका व संगीतकार यांनी स्वरबद्ध केली आहे. या गीतकाव्यात महाराजांच्या राज्याभिषेकावरील एक गीत आहे. आज 350 व्या राज्याभिषेकानिमित्त महाराजांच्या रयतेला व रसिकांना सादर करतो असल्याचे महानोर यांनी म्हटले आहे.

भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार,

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार, अनंत भालेराव स्मृतिपुरस्कार.22 फेब्रुवारी 2012 – पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद 24 मार्च 2014 – दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, पहिले जलसाहित्य संमेलन नागपूरचे संमेलनाध्यक्षपद 14 जानेवारी 2009 रोजी नंदुरबारचे पहिले जिल्हा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद त्यांनी भूषवले.

आपल्या सुमधुर कविता आणि गाण्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भान विसरायला लावणारा रानकवी आज सकाळी हरवला. भावपूर्ण श्रद्धांजली…….

– वर्षा श्रीनिवास भानप

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या