Tuesday, March 25, 2025
Homeनाशिककवी अमिताभ गुप्ता, नीलिमकुमार यांना 'कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान

कवी अमिताभ गुप्ता, नीलिमकुमार यांना ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे आज ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार’ बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना तर 2023 चा पुरस्कार आसामी कवी नीलिमकुमार यांना कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.एक लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

- Advertisement -

याप्रसंगी पुरस्कार निवड समिती अध्यक्ष डॉ.चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ.दिलीप धोंडगे उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

कुलगुरु डॉ.सोनवणे म्हणाले, की पुरस्कारासाठी यथोचित कवि निवडण्याचे शिवधनुष्य निवड समितीने यशस्वीरित्या पेलले आहे. कुसुमाग्रजांचे श्रेष्ठत्व पाळण्याचे, टिकविण्याचे व त्यात भर घालण्याचे काम या पुरस्काराच्या माध्यमातून होते आहे.

सत्काराला उत्तर देताना अमिताभ गुप्ता म्हणाले, की आपल्या पालकांसोबत नाशिकला येणे झाले होते. सात दशकांनंतर पुन्हा नाशिकला येतांना मनस्वी आनंद होतो आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कवी दडला असून, जीवन सुखी-समृद्ध करण्याची क्षमता कवितेत असल्याचे त्यांनी नमुद केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...