घारी |वार्ताहर| Ghari
कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील पोहेगाव (Pohegav) येथे दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी सहाचे सुमारास तीन चोरांनी माळवे सराफ या सोन्याच्या दुकानावर (Saraf Shop) दरोडा (Robbery) टाकून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सावधानतेमुळे त्यांचा प्लॅन फसला व नागरिकांनी त्यांना पकडून चोप दिला.
सोमवारी सायंकाळी सहा वाजता रस्त्यावरून तीन तलवारधारी तरुणांनी नागरिकांना तलवारी (Swords) दाखवत दहशत निर्माण करून माळवे सराफ यांच्या दुकानात प्रवेश केला. दुकानात असलेल्या माळवे यांच्या पत्नीला तलवारीचा (Swords) धाक दाखवत दुकानातील सर्व ऐवज त्यांनी एका खोक्यात भरला. व पळून जाण्याच्या तयारीत असतानाच माळवे यांनी एका चोराला पकडून ठेवले.
त्यातच आजूबाजूच्या नागरिकांनी दगड मारायला सुरुवात केल्यामुळे दुसरा चोर (Thief) पकडलेला चोराला सोडवण्यासाठी गेला व त्यांनी माळवे यांच्यावर तलवार उगारून त्याची सोडवणूक केली. तेथून ते घेतलेला सर्व ऐवज सोडून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले व त्यांना बेदम चोप दिला. या घटनेमुळेे व्यापार्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.