Friday, June 14, 2024
Homeनगरविष घेतलेला व्यक्ती पोलीस ठाण्यात बेशुध्द

विष घेतलेला व्यक्ती पोलीस ठाण्यात बेशुध्द

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

विरोधात फिर्याद दिल्याचा राग मनात धरून एक व्यक्ती विषारी पदार्थ सेवन करून कोतवाली पोलीस ठाण्यात आला. तो प्रवेशव्दारातच कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अमित कारभारी आंधळे (वय 36 रा. नेप्तीनाका) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दरम्यान विषारी पदार्थ सेवन करून पोलीस ठाण्यात आल्याने आंधळेविरूध्द भांदवि कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस नाईक वंदना काळे यांनी फिर्याद दिली आहे. अमित आंधळे याच्याविरोधात त्याचा मेव्हणा राम विष्णू डमाळे (रा. बारादरी, ता. नगर) याने कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली होती.

पोलिसांनी आंधळे विरोधात भांदवि कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून आंधळे याने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तो पदार्थ सेवन करून कोतवाली पोलीस ठाणे परिसरात आल्याने त्याच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या