Friday, June 14, 2024
Homeनगरविषारी औषध सेवन करून महिलेची आत्महत्या

विषारी औषध सेवन करून महिलेची आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

राहत्या घरी विषारी औषध सेवन (Poisonous Drug Consumption) करून महिलेने आत्महत्या (Woman Suicide) केली. आव्हाडवाडी (ता. नगर) गावात ही घटना घडली. सोनाली बाबासाहेब बुळे (वय 33 रा. आव्हाडवाडी, ता. नगर) असे मृत महिलेचे (Woman) नाव आहे. सोनाली बुळे यांनी रविवारी दुपारी साडे बारा वाजता राहत्या घरी विषारी औषध सेवन केले.

तिचे नातेवाईक मंगल अशोक बुळे यांनी औषोधपचाराकरीता तिला सावेडीतील पाईपलाइन रस्त्यावरील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गिते यांनी सोनालीला मयत घोषित केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक दीपक गांगर्डे पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या