Monday, July 22, 2024
Homeनंदुरबारवाद्य वाजवण्यावरून श्रीराम जन्मोत्सवाची मिरवणूक पोलीस प्रशासनाने केली स्थगित

वाद्य वाजवण्यावरून श्रीराम जन्मोत्सवाची मिरवणूक पोलीस प्रशासनाने केली स्थगित

शहादा, Shahada | ता. प्र. –

- Advertisement -

श्रीराम नवमीनिमित्त निघणारी श्रीराम जन्मोत्सवाची मिरवणूक (Shri Ram Janmotsava procession) पोलीस प्रशासनाने (Police administration) वाद्य वाजवण्यावरून (musical instruments) स्थगित (postpones) केल्याने शहरात काही काळ शहरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी शहरातील चावडी चौकात श्रीराम जन्मोत्सव समिती (Shriram Janmotsav Samiti) व हिंदुत्ववादी संघटनांच्या (Hindu organization) कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला (Sit down). शेवटी मिरवणूक स्थगित करुन रात्री उशिरापर्यंत मंदिरासमोरील चौकात बसून हजारो रामभक्तांनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) व रामधून सुरू केली. या घटनेच्या निषेधार्थ उद्या दि. ११ एप्रिल रोजी शहादा बंदचे (Shahada closed) आवाहन करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस प्रशासनातर्फे (Police administration) बंद मागे घेण्याचे आवाहन करण्यात येत होते.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना मुळे सण उत्सव व मिरवणूकांवर बंदी होती. दोन वर्षानंतर प्रथमच शहरात प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव समिती (Shriram Janmotsav Samiti), बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद तर्फे मिरवणुकीचे आयोजन (Organizing the procession) करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता शहरातील शहीद लालदास चौकात असलेल्या श्रीराम मंदिरापासून सजवलेल्या रथावर श्रीरामाची भव्य प्रतिमा ठेवून मिरवणूकीला सुरुवात होणार होती.

परंतु वाद्यांवरुन (musical instruments) पोलिस प्रशासन व हिंदुत्ववादी संघटनांमध्ये वाद (Argument) झाल्याचे समजते. यावेळी उपस्थित पाच ते सहा हजार राम भक्तांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी (Sloganeering) केली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना ज्यादा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला रामभक्त ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. पोलिसांच्या विरोधात चौकात बसून ठिय्या आंदोलन सुरू केले.

शहादा पालिकेचे माजी गटनेते मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील, मराठा महासंघाचे श्याम जाधव, विश्व हिंदू परिषदेचे अजय शर्मा आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पर्यायाने राम भक्तांनी सजवलेल्या रथासमोरच अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती ठेवून अखंड रामधुन व हनुमान चालीसा सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरूच होता.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, शहादयाचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

आज शहादा बंदचे आवाहन

रामनवमीला दरवर्षी शांततेत निघणारी मिरवणूक आज प्रशासनाने (Police administration) रद्द केल्याने प्रशासनाचा निषेध म्हणून उद्या सोमवारी (ता.११), विश्व हिंदू परीषद , बजरंग दल, श्रीराम जन्मोत्सव समितिने सोशल मीडियावर शहादा बंद (Shahada closed) चे आवाहन केले आहे. रात्री उशिरापर्यंत बंद मागे घेण्याबाबत पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या