Thursday, October 15, 2026
HomeनगरAhilyanagar : चार पोलीस अधिकारी-अंमलदारांचे निलंबन मागे

Ahilyanagar : चार पोलीस अधिकारी-अंमलदारांचे निलंबन मागे

पुन्हा सेवेत रूजू होण्याचे एसपींचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा पोलीस दलातील निलंबित करण्यात आलेल्या चार पोलीस अधिकारी व अंमलदारांना निलंबनातून मुक्त करून पुन्हा सेवेत रूजू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जारी केले आहेत. संबंधितांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. निलंबनातून मुक्त करण्यात आलेल्या या अधिकारी-अंमलदारांची संगमनेर शहर, कर्जत, शिर्डी शहर वाहतूक शाखा आणि अकोले पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांना 27 जुलै रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांना आता निलंबनातून मुक्त करून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांना 23 जून रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांची कर्जत पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. अंमलदार बाळासाहेब राठोड यांना 21 जुलै रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांना निलंबनातून मुक्त केल्यानंतर शिर्डी शहर वाहतूक शाखेत नियुक्त करण्यात आले आहे.

तसेच, पोलीस अंमलदार शंकर चौधरी यांना 13 जुलै रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांना आता निलंबनातून मुक्त करून त्यांची अकोले पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व अंमलदारांविरूध्द प्रलंबित असलेल्या खातेनिहाय शिस्तभंगविषयक कारवाईच्या अधीन राहून त्यांना निलंबनातून मुक्त करण्यात आले आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : साईबाबा संस्थानच्या पादुका दौर्‍यामुळे शिर्डीत भाविकांची संख्या घटली

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi श्री साईबाबा संस्थान प्रशासन शिर्डीत येणार्‍या भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्याऐवजी साईबाबांच्या पादुका विविध राज्यांत आणि देशांत घेऊन जाण्यातच मग्न आहे. संस्थानच्या...