Thursday, September 19, 2024
Homeक्राईमNashik Crime News : दहशत माजविणाऱ्या गुंडांची टोळी गजाआड

Nashik Crime News : दहशत माजविणाऱ्या गुंडांची टोळी गजाआड

मद्यालयाजवळ हैदाेस घालणारा सराईत पंधरा दिवसांनी ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

पुणे राेडवरील (Pune Road) मद्यालयाबाहेर शेंगदाणे, फुटाणे विक्री करणाऱ्या महिलेस मारहाण (Beating) करुन तिचा हातगाडा उलथवून दराेडा टाकणाऱ्या टाेळीतील मुख्य गुन्हेगारास गुन्हेशाखेच्या गुंडाविराेधी पथकाने अटक (Arrested) केली आहे. पाच जणांच्या टाेळीतील दाेघांना यापूर्वीच अटक झाली असून गुंडा विराेधी पथकाने मुख्य सुत्रधाराचा पाठलाग करुन त्याला गजाआड केले आहे.

हे देखील वाचा : ‘जेल’ मधील लाचखाेर डाॅक्टर ‘एसीबी’च्या जाळ्यात

किरण रतन पाटील उर्फ गुजर (वय -३५, रा. पंचशिलनगर, शिवाजी नगरमागे, उपनगर) असे संशयिताचे (Suspect) नाव आहे. या संशयितांनी पुणे राेडजवळ हातात लाठ्या काठ्या घेऊन हैदाेस घालत हातगाडीचालक महिलेसह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक मारहाण केली हाेती. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही समाेर आले आहे. दि. २७ जून २०२४ रोजी उपनगर पोलीसांच्या हद्दीतील पुणे राेडवरील रावल वाईन्सजवळ अलका रामा साटोटे या हातगाडीवर शेंगदाणे फुटाण्याची विक्री करत हाेत्या. त्याचवेळी संशयित सागर सदावर्ते, किरण पाटील, रोहित जाधव व दोन अनोळखी संशयितांनी मागील भांडणाचा राग मनात धरुन साटाेटे यांना शिवीगाळ व धमकी देत त्यांच्या हातगाडीवरील शेंगदाणे, फुटाणे व साहित्याची नासाडी करुन हातगाडी उलथविली हाेती.

हे देखील वाचा : Nashik News : क्राईमडायरी – तीन चोरीच्या घटनांसह आत्महत्येची घटना

तसेच साटाेटे यांना दांड्याने मारहाण करुन छाेट्या गल्ल्यातील ७०० रुपये जबरीने पळवून नेले हाेते. याबाबत ११ जुलै रोजी उपनगर पोलीस ठाण्यात संशयित टाेळक्यावर दराेडा टाकल्यासह मारहाण व दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. तपास सुरु असतानाच उपनगर पाेलिसांनी सागर सदावर्ते व राेहित जाधव यांना अटक केली हाेती. तर किरण पाटील व त्याचे साथीदार पसार हाेते. तपासादरम्यान, मुख्य संशयित किरण पाटील हा उपनगरच्या पंचशीलनगर येथे असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहायक पाेलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना कळविली.

हे देखील वाचा : Nashik Accident News : कसारा घाटात कंटेनरची सहा ते सात वाहनांना धडक

यानंतर कारवााईच्या (Action) सूचना मिळताच अंमलदार अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी किरण सापळा रचला. तेव्हा पाटील याला पोलीस आल्याची कुणकुण लागताच त्याने दुचाकीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकाने पाठलाग करुन पाटीलला ताब्यात घेत पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने ही कारवाई गुंडाविराेधी पथकाचे एपीआय ज्ञानेश्वर माेहिते, अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, मलंग गुंजाळ, राजेश सावकार, सुनिल आडके, प्रविण चव्हाण, निवृत्ती माळी, मनिषा कांबळे यांनी केली. 

हे देखील वाचा : Nashik Crime News : परिमंडळ दाेनमध्ये सरप्राईज कॉम्बिंग; ७७ टवाळांवर कारवाई

२७ जूनचा राडा सीसीटीव्हीत कैद

पाचही संशयित हातात दांडके घेऊन परिसरात दहशत माजवित हाेते. त्यानंतर त्यांनी साटाेटे यांना धमकावत हातगाडीवरील मालाचे नुकसान करुन ती उलथवून दिली. यानंतर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकावत दांडक्याने प्रहार केले. यामुळे या भागात अचानक दहशत निर्माण हाेऊन स्थानिकांनी व्यवहार बंद केले. सर्वच नागरिक जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळायला लागले. यानंतर पाचही जणांनी मागे न हटता ताेडफाेड, दहशत सुरुच ठेवली. काही वेळानंतर सर्वच पसार झाले. या संशयितांवर यापूर्वीही किरकाेळ व गंभीर गुन्हे नाेंद असून सर्वच बेराेजगार आहेत. संशयितांनी याआधीगी मद्यपान करुन हल्ला करणे, ताेडफाेड करण्यासह धमकावून मारहाण केल्याचे अनेक प्रकार समाेर येत आहेत. त्यानुसार तपास सुरु आहे. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या