Sunday, May 26, 2024
Homeजळगावपोलिसांकडून दोन अट्टल चोरट्यांना अटक

पोलिसांकडून दोन अट्टल चोरट्यांना अटक

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील करगाव रस्त्यावरील श्रीकृष्ण कॉलनीतील (Srikrishna Colony) घरफोडीचे घटनास्थळाचे (scene of the burglary) सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील (CCTV cameras) फुटेज (footage) पाहून चाळीसगाव पोलिसांनी (police) गुन्हे करणार्‍या आरोपींची इतर पोलिस ठाण्यांकडून माहिती घेतली. या तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीच्या गुन्ह्यात संशयित शेख रहीम उर्फ शेख चांद (वय २६) व शेख खय्युम शेख रफीक(वय २०) दोन्ही रा. कुर्बानी शहा नगर, दर्गा रोड परभणी यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. चाळीसगाव पोलिसांच्या विशेष पथकाने परभणीत या दोघांना अटक (arrested ) केली.

- Advertisement -

पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या दोन गुन्ह्यातील लुटीचा जवळपास ७० ग्रॅम सोने हस्तगत केले. या आरोपींनी करगाव रस्त्यावरील श्रीकृष्ण कॉलनीतील चोरी व्यतिरिक्त गेल्या वर्षी देखील चाळीसगाव शहरात दिवसाढवळ्या घरफोडी केल्याची कबुली दिली.

दरम्यान सराईत चोरटे जेरबंद करण्यात आल्याने शहरातील आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, पोलिस निरीक्षक के.के. पाटील, सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राहूल सोनवणे, दीपक पाटील, भूषण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश पाटील, अमोल भोसले, अमोल पाटील, विजय पाटील, विनोद खैरनार, उज्वलकुमार म्हस्के यांनी ही कामगिरी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या