Friday, December 6, 2024
Homeनगरपोलीस कर्मचार्‍याला मारहाण करणारे चौघे गजाआड

पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करणारे चौघे गजाआड

अहमदनगर|Ahmedagar

दुचाकीची धडक लागल्याच्या कारणातून पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करत लुटणार्‍या चौघांना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. श्याम बाबासाहेब जाधव (वय 20), रोहन राजु जाधव (वय 20), दीपक कचरू माळी (वय 20) व विकास लक्ष्मण भालेराव (वय 21 सर्व रा. निबोंडी ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

मुख्यालयात नेमणूकीस असलेले पोलीस कर्मचारी अदिनाथ दिनकर शिरसाठ (रा. आष्टी जि. बीड) हे 10 जानेवारी 2022 रोजी अहमदनगर शहरातील चांदणी चौकातील महालक्ष्मी मंदिराच्या समोरून त्यांच्या दुचाकीवर जात असताना दुचाकीची धडक लागल्याच्या कारणातून त्यांना आठ जणांनी मारहाण केली होती. शिरसाठ यांच्याकडील 20 हजार रूपयांची रक्कम व 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल काढून घेतला होता. याप्रकरणी शिरसाठ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे श्याम बाबासाहेब जाधव, रोहन राजु जाधव (दोघे रा. निंबोडी ता. नगर) व अनोळखी सहा जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाले होते. कोतवाली पोलिसांनी त्यांचा निबोंडसह इतरत्र शोध घेतला; पण ते मिळून आले नव्हते. दोन दिवसापूर्वी कोतवाली पोलिसांना आरोपीचा सुगावा श्रीगोंदा, दौंड परिसरात लागला होता. तेथे जात पथकाने तिघांना अटक केली. एकाला निबोंडीतून ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार योगेश कवाष्टे, गणेश धोत्रे, अमोल गाढे, दीपक रोहकले, संतोष गोमसाळे, सलीम शेख, योगेश भिंगारदिवे, नितीन शिंदे, अभय कदम, अतुल काजळे, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या