Saturday, April 26, 2025
Homeनगरपोलिसात तक्रार देणार्‍या महिलेचा विनयभंग

पोलिसात तक्रार देणार्‍या महिलेचा विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पोलिसात (Police) तक्रार देणार्‍या महिलेचा विनयभंग (Woman Molested) करून धमकावण्यात आले. सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील एका उपनगरात शुक्रवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी सुरज नंदकुमार औटी (रा. सहकारनगर, पाईपलाईन रस्ता) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

सुरज औटी यांचे मालमत्ताच्या कारणातून सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील एका कुटुंबाशी वाद आहेत. सुरज आणि त्याची आई शोभा यांना या कुटुंबातील एका वृध्द महिलेला सायंकाळी सव्वा पाच वाजता धमकावले (Threat) होते. या वृध्द महिलेने सुनेसह तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल (Filed a Case) केला होता. तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती सुरज याला मिळाली.

प्रा. होले हत्या प्रकरणात राहुरीचे तीन सराईत जाळ्यात

त्यावर तो पुन्हा या कुटुंबाच्या घरी रात्री आठ वाजता आला. त्याने महिलेला धमकावले. ‘पोलीस ठाण्यात तक्रार का दिली’, असे म्हणून धमकावले तसेच जीव मारण्याची धमकी (Threat) दिली. या महिलेशी गैरवर्तन केले. या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सुरज औटी याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

मुलीला भेटण्यासाठी आलेल्या महिलेला मारहाण

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अधिक माहिती घेऊन तपासाबाबत पोलीस अंमलदारांना सूचना दिल्या आहेत.

विधानसभेत श्रीरामपूर पोलिसांची तिसर्‍यांदा चिरफाड

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...