Wednesday, March 26, 2025
Homeनगरपोलीस शिपाई पदासाठी येत्या रविवारी लेखी परीक्षा

पोलीस शिपाई पदासाठी येत्या रविवारी लेखी परीक्षा

25 जागांसाठी 212 उमेदवार पात्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या 25 जागेसाठी शारिरीक व मैदानी चाचणी पार पडल्यानंतर येत्या रविवारी (7 जुलै) येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीत किमान 50 टक्के म्हणजेच 25 गुण (50 पैकी) मिळविणार्‍या उमेदवारांमधून एकास दहा या प्रमाणात एकूण 212 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 25 पोलीस शिपाई व 39 चालक शिपाई अशा 64 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

- Advertisement -

19 ते 27 जून या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली. मात्र पोलीस चालक शिपाई यांच्यासाठी वाहन टेस्ट बाकी असल्याने त्यांची लेखी परीक्षा नंतर घेण्यात येणार आहे. सध्या पोलीस शिपाई पदासाठी येत्या रविवारी लेखी परीक्षा होणार आहे. पोलीस शिपाई पदाच्या 25 जागा असून त्यासाठी एकूण 879 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली होती. त्यापैकी 441 उमेदवारांना 25 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत. सदर उमेदवारांमधून एकास दहा या प्रमाणात प्रवर्गनिहाय एकूण 212 एवढेच उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात आली आहे.

येत्या रविवारी येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी सात वाजता लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी महाआयटीच्या संकेतस्थळावर जाऊन हॉल तिकीट डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेसाठी पहाटे पाच वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहण्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कळविले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Snehal Jagtap : स्नेहल जगताप यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला अखेर जय महाराष्ट्र;...

0
मुंबई । Mumbai कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. ही गळती थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणतीही पावले उचलण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. आता...