Thursday, September 19, 2024
HomeUncategorizedNashik News : तळीरामांची झिंग उतरणार; आषाढी अमावस्येनिमित्त पाेलिसांचा कडेकाेट बंदाेबस्त

Nashik News : तळीरामांची झिंग उतरणार; आषाढी अमावस्येनिमित्त पाेलिसांचा कडेकाेट बंदाेबस्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

श्रावण महिन्याला प्रारंभ होण्यापूर्वी आषाढी अमावस्येचे (Ashadhi Amavasya) जाेरदार स्वागत करण्यासाठी अनेकांनी मदिरालयांबाहेर माेठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. बिअर, बारही तुडुंब झाल्याचे शनिवारी पाहायला मिळाले. त्यात शनिवार आणि रविवारची लागून आलेला वीकेंड व ‘फ्रेंडशिप डे’ची संधी साधत मद्यपींनी मद्य रिचविण्यास शनिवारी सकाळपासूनच सुरूवात केली. पर्यटनस्थळांलगतच्या मोकळ्या जागेत रंगलेल्या ‘ओल्या पार्ट्यां’चे फड पोलिसांनी (Police) हेरले. त्यामुळे तळीरामांची ‘झिंग’ उतरविण्यासाठी पोलिसांनी शहरासह जिल्ह्यात चोख नाकाबंदी केली. साेबतच ‘ब्रेथ ॲॅनॅलायझर’ने वाहन चालकांची तपासणी सुरू असून दाेषी आढळणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जात आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले

शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. तेराही पोलिस ठाण्यांच्या (Police Station) पथकासह निर्भया, दामिनी मार्शल्स तैनात असून बार, रेस्टॉरंट, वाइन शॉपलगत बीटमार्शल्स व गुन्हे शाखांच्या पथकांची गस्त साेमवारी रात्री पर्यंत सुरू असेल. या आदेशानुसार शनिवारी (दि. ३) सकाळपासून पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने अनेकांनी शनिवारीच शहराबाहेर जात पार्टी रंगविण्यावर भर दिला. त्यामुळे जिल्ह्यातून शहराकडे (City) येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवल्याचे दिसले.

हे देखील वाचा : Nashik Rain News : पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागांत तीन आपत्तीजनक घटना

तर, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने (Vikram Deshman) यांच्या आदेशान्वये, नाशिक तालुका, इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, त्र्यंबकेश्वर हद्दीतील हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्टजवळ बंदोबस्त नेमण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखांच्या पथकांनी काही हॉटेलांची तपासणी करुन संबंधितांना सूचना दिल्या. तसेच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पहिने या भागात शनिवारी सकाळी आठ वाजेपासून बॅरकेडिंग केल्याचे दिसले. रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी मद्यपींसह हुल्लडबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू होती.

हे देखील वाचा : मुसळधार पावसामुळे चांदोरीतील प्रसिद्ध खंडेराव मंदिर पाण्याखाली

चोरीछुप्या ‘पार्ट्यां’सह अवैधरित्या होणाऱ्या व्यवसायावर पोलिस कारवाई करणार का?

शहरासह जिल्ह्यातील काही हॉटेलांत अवैधरित्या मद्य प्राशनाला ग्राहकांना परवानगी देण्यात येते. शहरातील अंबड, इंदिरानगर, गंगापूर, पंचवटी, म्हसरूळ पोलिसांच्या हद्दीसह ग्रामीणच्या नाशिक तालुका, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, घोटी, वाडीवऱ्हे हद्दीतही असे हॉटेल्स आहेत. मद्य विक्री किंवा परमिट रूमचा परवाना नसताना व्यावसायिक ग्राहकांना संधी देतात. त्यामुळे चोरीछुप्या ‘पार्ट्यां’सह अवैधरित्या होणाऱ्या व्यवसायावरही पोलिस कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या