Tuesday, July 28, 2026
HomeनगरPathardi : पोलिसांवर गुन्हा दाखल करा; खर्चन मृत्यूप्रकरणी वंचितचे ठिय्या आंदोलन

Pathardi : पोलिसांवर गुन्हा दाखल करा; खर्चन मृत्यूप्रकरणी वंचितचे ठिय्या आंदोलन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पोलीस स्टेशनच्या आवारात सोमवारी (दि.25) मृत झालेल्या विठ्ठल रावसाहेब खर्चन प्रकरणी पोलीस निरीक्षक विलास पुजारी व इतर कर्मचार्‍यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मंगळवारी(दि.26) पोलीस स्टेशनच्या आवारात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा.किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे हे पाथर्डी पोलीस स्टेशनला आले व त्यांनी या विषयवार आंदोलकांशी चर्चा केली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते.

- Advertisement -

सोमवारी रात्री तालुक्यातील औरंगपूर येथील एक महिला तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप करत पोलीस स्टेशनला खर्चन याच्या समवेत आली होती. यावेळी संबंधित महिलेने व तिच्या मुलाने अंगावर ज्वलनग्रह पदार्थ टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला असता याच वेळी खर्चन हे खाली पडले. त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच प्रा. किसन चव्हाण हे उपजिल्हा रुग्णलयात आले व त्यांनी पुजारी व इतर कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल केल्या शिवाय अंत्यसंस्कार केले जाणार नाही अशी भूमिका घेत पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.

आंदोलकांशी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू व शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चर्चा केली. यावेळी राजगुरू व चव्हाण यांच्यात शाब्दिक चकमक उडून चव्हाण यांनी पोलीस स्टेशनच्या दारात धरणे आंदोलन सुरु केले.आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे, किसन आव्हाड, अरविंद सोनटक्के, निखिल खर्चन, नारायण शेकडे, प्यारेलाल शेख, वसंत बोर्डे, अंबादास आरोळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी खर्चन यांच्या मृत्यू प्रकरणाची त्रयस्थ पोलीस अधिकार्‍याची नियुक्ती करून चौकशी केली जाईल व याप्रकरणी जे कर्मचारी व अधिकारी दोषी असतील त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आंदोलकांना सांगितले मात्र आंदोलकांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत पुजारी यांची इतरत्र बदली करा. त्या शिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार अशी भूमिका घेत आंदोलन चालूच ठेवले. दरम्यान, मृत खर्चन याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहिल्यानगरला सायंकाळी हलवण्यात आला होता. या आंदोलनमुळे सोमवारी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

ताज्या बातम्या

Rahata : जायकवाडीचा साठा 58.52 टक्क्यांवर

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे मध्यम स्वरूपाचे आगमन होत आहे. धरणातील विसर्ग नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने घटविण्यात आले आहेत. गोदावरीत काल सायंकाळी...