Monday, August 17, 2026
Homeक्राईमPathardi : पोलिसांवर गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक

Pathardi : पोलिसांवर गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील खरवंडी कासार येथे सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर गोळीबार प्रकरणातील तिघा जणांना पोलिसांनी मंगळवारी (दि.9) अटक केली आहे. 11 जून 2026 पर्यंत तिघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील न्यायाधीशांनी दिले आहेत.

- Advertisement -

सुदाम बबन राठोड, इब्राहीम मंहमद सय्यद व कृष्णा उर्फ रंगा बाळु पवळे (सर्व रा.खरवंडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील गोळीबार करणारा मुख्य आरोपी पावलस उर्फ मेहर कचरु गायकवाड हा मात्र फरार झाला आहे. दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला संशयीत आरोपी पावलस याला पकडण्यासाठी सोलापुर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खरवंडी कासार येथे आले होते. पाथर्डीचे पोलिसही त्यांच्या सोबत होते. पावलस गायकवाड याने पोलिसांना पाहताच गोळीबार केला. त्यानंतर तो घरासमोरील चारचाकी गाडी घेवून पळून गेला. त्याच्या तीन साथीदारांना सुदाम पोलिसांनी मंगळवारी (दि.9) अटक केली. येथील न्यायालयासमोर तिघांना तपासी अधिकारी उपनिरीक्षक विशाल लहाने यांनी हजर केले.

तिघांनाही न्यायलयाने 11 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, खरवंडी कासार हे मराठवाड्याच्या सीमेवर असलेले पाथर्डी तालुक्यातील गाव असून या भागात बीडकडील काही गुंडाचा व गुन्हेगारांचा वावर असतो. गुन्हे केल्यानंतर लपण्याची जागा खरवंडी परीसर बनत चालली आहे. युवकही या गुंडशाहीला बळी पडत आहेत. बनावट दारु विक्री करणारे मोठे रँकेट या भागात असून गोव्याची बनावट दारु श्रीरामपुर मार्गे या भागात पोहचते. गुंडाच्या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...