Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारपोलीस निरीक्षकाला पोलीसाची मारहाण?

पोलीस निरीक्षकाला पोलीसाची मारहाण?

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाला (police inspector) एका पोलीस कर्मचार्‍याने (police officer) मारहाण (Beaten) केल्याची चर्चा जिल्हाभरात सुरु आहे. मात्र, या घटनेनंतर त्या पोलीस कर्मचार्‍याला मुख्यालयी जमा करण्यात आल्याचे समजते.

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाला त्याच्याच कॅबिनमध्ये एका त्रस्त कर्मचार्‍याने मारहाण केल्याची चर्चा जिल्हाभरात सुरु आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हे पोलीस निरीक्षक कर्मचार्‍यांना त्रास देत असल्याची बाब यावरुन समोर आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचार्‍याने पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये घुसून त्याला मारहाण केल्याचे समजते.

त्यानंतर सदर संबंधीत पोलीस निरीक्षकाच्या तक्रारीनंतर त्या कर्मचार्‍याला जिल्हा मुख्यालयी जमा केल्याचे समजते. मात्र या कर्मचार्‍याविरूध्द कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या