Monday, May 27, 2024
Homeनगरगणेशोत्सवात करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे - गायकवाड

गणेशोत्सवात करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – गायकवाड

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मागील वर्षी सारखेच सर्व नियम पाळून गणपतीची प्राणप्रतिष्ठा सर्वांनी घरी करावी. सार्वजनिक गणेश मंडळांना मिरवणूक काढता येणार नाही, वाद्य वाजवता येणार नाही. साधेपणाने करोनाचे सर्व नियम पाळून सरकारच्या धोरणानुसार चार फुटी गणेश मूर्ती बसवता येईल. सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असेल. सर्वांनी सर्व नियमाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नवीन पदभार स्वीकारलेले राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केले.

- Advertisement -

पुणतांबा येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गणपती उत्सव संदर्भात अहमदनगर तोफखाना खात्यामधून बदली झालेले राहाता येथील नवीन पी. आय. सुनील गायकवाड यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्याप्रसंगी गायकवाड यांनी तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणा भविष्यात पुणतांबा सारख्या खेडेगावात राबवण्यात येणार आहे, त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. गावात कोणत्याही ठिकाणी काही घडल्यास मोबाईलवर लगेच मेसेज प्राप्त होईल. लोक जागृत व सावध होतील व पोलिसांना मदतीचा हातभार लागेल.

श्री. गायकवाड यांनी पुणे, कर्जत, नागपूर, जळगाव अशा ठिकाणी 33 वर्ष सेवा केली. या याप्रसंगी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, मुरलीधर थोरात, उपसरपंच योगेश घाटकर, सदाशिव वहाटोळे, अरुण बाबरे, पुणतांबा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल दिलीप मंडलिक, पोलीस नाईक राजेंद्र बर्डे, किशोर कदम, मनोज गुजराथी, भाऊसाहेब केरे, शंकर शेलार, भागवत धनवटे, नवनाथ वायकर, गणेश मोरे, मधुकर पेटकर, दत्तात्रय बोर्डे, ग्रामपंचायत कर्मचारी व काही ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या