Friday, June 26, 2026
HomeनाशिकNashik Police News : पोलीस आयुक्तालयाला मिळाले तीन सहायक आयुक्त; तीन एसीपींना...

Nashik Police News : पोलीस आयुक्तालयाला मिळाले तीन सहायक आयुक्त; तीन एसीपींना मुदतवाढ, ग्रामीणला नवे डीवायएसपी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या अनेक महिन्यांपासून खोळंबलेल्या सहायक पोलिस आयुक्त, उपअधीक्षक पदांच्या बदल्यांना मंगळवारी (दि. २३) मुहूर्त लागला. त्यानुसार, नाशिक आयुक्तालयास (Nashik Police Commissionerate) नव्याने तीन सहायक आयुक्त मिळाले असून कार्यरत तिन्ही एसपींना वर्षभराची मुदतवाढ मिळाली आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तीन नवे एसीपी मिळाले असून अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्यांच्या खांद्यावरील ओझे काहीसे कमी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नाशिक आयुक्तालयातून सरकारवाडा विभागाचे (Sarkarwada Division) एसीपी सुधाकर सुरडकर यांचीच ठाणे आयुक्तालयात बदली झाली असून गुन्हे व विशेष शाखेचे एसीपी संदीप मिटके, अंबड विभागाचे एसीपी सचिन बारी व पंचवटी विभागाचे एसीपी शेखर देशमुख यांना आहे त्याच पदावर एक वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. राज्याच्या गृह खात्याने मंगळवारी (दि. २३) भारतीय व राज्य पोलिस सेवेतील २०० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

त्यानुसार, नाशिक शहर आणि जिल्ह्यासह (Nashik City and District) विविध विभागांत दहा नवे अधिकारी मिळाले आहेत. सिंधुदुर्ग येथील पोलिस निरीक्षक दिलीप पिठे यांची महाराष्ट्र पोलिस अकादमीत (एमपीए) पोलिस उपअधीक्षकपदी (डीवायएसपी) बदली झाली असून बुलडाणा येथील पोलिस निरीक्षक पंडित सोनावणे यांची नाशिक येथील नागरी हक्क संरक्षण विभागात उपअधीक्षकपदी बदली झाली आहे. शिवाय, एमपीएतील पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर व सीमा परिहार यांनाही उपअधीक्षक पदाचे प्रमोशन मिळाले आहे.

तर, नाशिक शहर वाहतूक शाखेतील वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांची अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक किशोर चौधरी यांची एमपीए उपअधीक्षकपदी नियुक्ती मिळाली आहे. तर, रमेश माणगावकर हे आता मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) असतील आणि ब्रह्मदेव शेळके हे कळवण उपविभागाचे एसडीपीओ असतील. शिवाय नाशिक येथील अमली पदार्थविरोधी पथकाचे उपअधीक्षक गुलाबराव पाटील यांची नंदुरबार (Nandurbar) येथे बदली झाली असून त्यांच्या जागी सतीश गोराडे ह उपअधिक्षक असणार आहेत.

हे नवे अधिकारी आले

अधिकारी (पद)                         कुठून                         कुठे 

पूमन पाटील (उपअधिक्षक)  –  अकाेला पीटीसी    –       एसीपी, नाशिक शहर

माधव रेड्डी (एएसपी)        –    एसीबी, नाशिक     –      एसीपी, नाशिक शहर

साेहन माछरे (पीआय)    –       नाशिक शहर       –       एसीपी, नाशिक शहर 

कविता फडतरे (डीवायएसपी) – एमपीए, नाशिक      –    एएसपी, एसीबी, नाशिक

सुरेखा पाटील (पीआय)      –   नाशिक शहर        –    उपअधिक्षक, नाशिक ग्रामीण

बाजीराव महाजन (एसडीपीओ) – मनमाड         –       एक वर्ष मुदतवाढ

भगीरथ देशमुख (डीवायएसपी) – नाहसं, नाशिक –       अपर उपायुक्त, एसआयडी

संजय बांबळे(एसडीपीओ)  –     धुळे               –       एसडीपीओ, नाशिक ग्रामीण

ताज्या बातम्या

राम

Ram Mandir Donation Case: राम मंदिराच्या दान चोरी प्रकरणी मोठी घडामोड;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या(AyodhyaRamMandir) दान चोरी प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय आणि मोठे वळण मिळाले आहे. राम मंदिर ट्रस्टमधील...