Monday, September 7, 2026
Homeनगरपोलिस अधिकार्‍यांना ड्रग्ज तस्करांना थेट अटक करण्याचे अधिकार

पोलिस अधिकार्‍यांना ड्रग्ज तस्करांना थेट अटक करण्याचे अधिकार

आरोपींना मकोका, तडीपार करण्याच्या कारवाईला वेग येणार

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

- Advertisement -

राज्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. अंमली पदार्थ विरोधी कृती दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि त्यावरील सर्व अधिकार्‍यांना ड्रग्ज तस्करांना थेट अटक करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे आरोपींना मकोका लावण्यापासून तडीपार करण्याच्या कारवाईला वेग येणार आहे.

राज्यात गेल्या काही वर्षापासून अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकार उघडकीस येत आहेत. शाळा, महाविद्यालये, हुक्कापार्लर हायप्रोफाईल पार्ट्यांपासून थेट पान-सिगारेटच्या टपर्‍यांवर ड्रग्ज सहजपणे उपलब्ध होते. या ड्रग्स प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले होते. शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी विधानसभेत मुंबईतील अंमली पदार्थ सेवन आणि विक्रीबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात कडक पावले उचलण्याची आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमधील आरोपींवर मकोका लावण्याची घोषणा केली होती.

या पार्श्वभूमीवर गृह विभागाने मंगळवारी राजपत्र जारी केले. त्यानुसार महाराष्ट्रातील अमली पदार्थ तस्करीवर थेट कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी कृती दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि त्यावरील दर्जाच्या सर्व अधिकार्‍यांना आता पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍याचे (प्रभारी अंमलदार) सर्व कायदेशीर अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. एफआयआर दाखल करणे, अटक करणे, घर, वाहनाची झडती, मालमत्ता जप्ती यासारखे अधिकार तपासी अधिकार्‍याला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता अंमली पदार्थांची प्रकरणे एका पोलीस ठाण्यातून दुसर्‍या पोलीस ठाण्यात वर्ग करण्याची प्रक्रिया कमी होईल. शिवाय तपासाला गती मिळून आरोपींना अटक करणे शक्य होणार आहे.

श्रीरामपूर, संगमनेर, अहिल्यानगरसह अन्य ठिकाणी अंमली पदार्थांच्या विक्रीचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातून जीवघेण्या हल्ल्याच्या घटनाही घडल्या होत्या. आता अंमली पदार्थ विरोधी कृती दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि त्यावरील सर्व अधिकार्‍यांना ड्रग्ज तस्करांना थेट अटक करण्याचे अधिकार बहाल करण्यात आल्याने या प्रकारांना आता अटकाव बसणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट...